Vengurle Municipal Council

Vengurle Municipal Council Vengurla is a town in Sindhudurg district of Maharashtra, India just north of Goa. This is first eve

14/01/2026
भावपूर्ण श्रद्धांजली
17/09/2024

भावपूर्ण श्रद्धांजली

29/06/2024

निठूर ता निलंगा

29/06/2024
27/10/2021

माणूस साक्षर झाला
पण कचरा व्यवस्थापनात
अडाणीच राहिला.

सद्यस्थितीत घनकचरा व्यवस्थापन -
घनकचरा ही एक जागतिक समस्या आहे. जसजसे नागरिकरण वाढले तसे कचऱ्याचे प्रमाण व त्यामधील अविघटनशील घटक यांचे प्रमाण वाढले.कचऱ्या मधील प्लास्टिक, काच, रबर, डेब्रिज इ. अविघटनशील घटकामुळे डंपिंग ग्राउंड वरील विघटनशील घटकांचे देखील नैसर्गिक रित्या विघटन होत नाही व त्यामुळे प्रत्येक शहरात कचऱ्याचे डोंगर निर्माण होतात व त्यामधून अहोरात्र विषारी वायू चे उत्सर्जन होत राहते म्हणजेच जागतिक तापमान वाढीला कारणीभूत ठरणाऱ्या घटकामध्ये घनकचऱ्या मधून उत्सर्जित होणाऱ्या हरित वायू चा हिस्सा साधारणपणे 4% आहे.

1950 पूर्वीची घनकचरा व्यवस्थापन पद्धत-
पूर्वी दैनंदिन कचऱ्या मध्ये विघटन शील घटकच असायचे. हा कचरा घराजवळ एका उकिरड्या मध्ये संकलित केला जात असे वर्ष भरात तो कचरा पूर्ण कुजून शेतात खत म्हणून टाकला जात असे. म्हणजेच दररोज निर्माण होणारा कचरा हा पूर्णतः विघटनशील असायचा व उकिरड्या मध्ये संकलित केला तरी दर वर्षी तो कुजून शेतीच्या भरण पोषणा साठी उपयुक्त ठरत असे.
अविघटनशील घटक -
यामध्ये भंगार डब्बे, काच व प्लास्टिक च्या बाटल्या,धातू, रब्बर इ. वस्तू वेगळे साठवून भंगार मध्ये विकले जात असत.

जुने कपडे - जुनी कपडे गोधडी शिवण्या साठी वापरली जात असत.

प्लास्टिक चा वापर फारसा नव्हता.
पेपर, पुट्टे कचऱ्यात येण्याजोगा वापर नव्हता.
एकंदर लोकांची क्रयशक्ती फारशी नव्हती त्यामुळे use &throw ही भावना नव्हती.

दाट नागरी भागात ही निर्माण होणाऱ्या कचऱ्या मध्ये विघटनशील घटकाचे प्रमाण जास्त असल्यामुळे एका जागेवर संकलित होणारा कचरा खत म्हणून उपयुक्त ठरत असे.

1950 नंतर चे घनकचरा व्यवस्थापन -
साधारणपणे 1950 नंतर प्लास्टिक चे प्रमाण झपाट्याने वाढले. कचऱ्यातील विघटनशील घटक कमी झाले प्लास्टिक व अनैसर्गिक घटकामुळे कचरा कुजण्या वर परिणाम झाला. उकिरडे पूर्वी पचन संस्थे प्रमाणे कार्य करत होती त्यांची पचन संस्था धोक्यात आली. त्यातून डंपिंग ग्राउंड चा जन्म झाला व छोटया खेड्या पासून मोठया शहरापर्यत घनकचरा हा विषय जटील बनला. वाद निर्माण होऊ लागले नियोजना साठी मोठया प्रमाणावर खर्च होऊ लागला.

वास्तव -
घनकचरा ही समस्या नसून रोजगाराची संधी आहे. परंतु घरामध्ये कचरा वेगवेगळ्या बीन्स मध्ये ठेवण्याची सवय लागली पाहिजे. म्हणजेच प्रक्रिया करणे सुलभ होईल व डंपिंग ग्राउंड निर्माण होणार नाहीत.

भारतामध्ये दररोज 152076 मे. टन एवढा कचरा निर्माण होतो त्यापैकी 55759 मे. टन एवढ्या कचऱ्यावर प्रक्रिया होते उर्वरित कचरा प्रक्रिया शिवाय डंपिंग ग्राउंड वर टाकला जातो. भारतात आजच्या स्थिती ला 3159 इतकी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाची डंपिंग ग्राउंड कचरा मुक्त होण्याची व मोकळा श्वास घेण्याची वाट पाहत आहेत.परंतु प्रत्येक व्यक्ती ला आपले घर स्वच्छ असावे वाटते तसे शहर स्वच्छ राहू शकेल का? डंपिंग ग्राउंड निर्माण होऊच नयेत म्हणून प्रयत्न करता येऊ शकतील का? कचरा प्रश्न कायम स्वरूपी निकाली निघेल का?

या सर्व प्रश्नांची उत्तरे होकारार्थी आहेत.
त्यासाठी आपणास आपल्या स्वतः पासून सुरुवात करायला हवी. आपली कचरा ठेवायची पद्धत बदलली पाहिजे. आपण एका डस्टबिन मध्ये कचरा ठेवतो तो सार्वजनिक ठिकाणी टाकतो अथवा महानगरपालिका ने सक्ती केल्यास वर्गीकरण करून कचरा घंटागाडी मध्ये टाकतो परंतु एका डस्टबिन मध्ये साठविलेला कचरा पुन्हा वेगळा केला तरी अपेक्षित परिणाम साथता येत नाही. सर्व कचरा एकत्र आल्यानंतर दुर्गंधी युक्त कचरा मूल्यवर्धन योग्य असणाऱ्या कचऱ्याच्या सानिध्यात आल्यावर सर्व कचरा बाधित होतो आणि कचऱ्या कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो कचरा म्हणजे घाण, दुर्गंधी असाच समज होतो .एकदा कचरा डस्टबिन मध्ये टाकल्या नंतर तो पुन्हा हाताळला जाणार नाही अथवा सर्व कचरा प्लास्टिक च्या पिशवी मध्ये घट्ट बांधून फेकून दिला की आपल्या घरातील कचरा व्यवस्थापन झाले असे आपण समजतो.प्लास्टिक चा अमर्याद वापर व वापरा आणि फेका ही सवय त्यामुळे महासागरा मध्ये देखील सागरी जीवांना धोका निर्माण झाला आहे. कचऱ्यामूळे परिसर विद्रुप होतोच शिवाय त्यामधून निघणाऱ्या विषारी वायू मूळे परिसर प्रदूषित होतो व परिसंस्था देखील धोक्यात येते.या सर्व पद्धती आपणास बदलणे आवश्यक आहे घरात निर्माण होणारा कचरा वेगवेगळा ठेवण्याची पद्धत अवलंबली पाहिजे वेंगुर्ला नगरपरिषद मध्ये 2015 साली 27 प्रकारात घराघरातून कचरा वर्गीकृत करून देण्याची पद्धत विकसित झाली, कर्जत मध्ये 2018 पासून 36 प्रकारात कचरा वर्गीकरण सुरु झाले. माथेरान मध्ये ही हीच संकल्पना आस्तित्वात आली परिणामी या तिन्ही ठिकाणी डम्पिंग ग्राउंड कचरा मुक्त झाले आहे व भविष्यात येथील डम्पिंग ग्राउंड हे कचरा मुक्तच राहील एवढेच नाही तर येथील डम्पिंग ग्राउंड व कचरा व्यवस्थापन अभ्यासाचा विषय बनले आहे.कल्याण डोंबिवली मध्ये ही हा प्रयोग यशस्वी होत आहे.येथील घनकचरा धनकचरा बनला आहे.देशात अनेक शहरामध्ये स्वच्छतेची संस्कृती रुजून नागरिकांच्या जीवनशैली चा भाग बनली आहे.
थोडक्यात कचरा ही समस्या नसून राष्ट्रीय साधन संपत्ती चे संवर्धन करण्याची संधी आहे, रोजगाराची संधी आहे. ओल्या कचऱ्यापासून Biogas, Bio CNG, विदयुत निर्मिती, कंपोस्ट खत इ. बाबी निर्माण करू शकतो तर सुक्या कचऱ्यातील प्लास्टिक, कागद, काच, रबर, धातू, इ. वेस्ट, कपडे, चपल, बूट इ. घटक रिसायकलिंग साठी उपयोगात आणू शकतो म्हणजेच Reduce, Reuse, Recycle हा मुलमंत्र जपला पाहिजे. तसेच मूळ स्थानी जास्तीत जास्त घटकांमध्ये कचरा विलगीकरण केल्यास कचरा ही समस्या न राहता रोजगाराची संधी असेल आणि कचरा ही जागतिक समस्या असली तरी प्रत्येक व्यक्ती ने सुरुवात आपल्या स्वतः पासून करणे आवश्यक आहे म्हणजेच Think Globally Act Locally

- डॉ.रामदास कोकरे

माणूस साक्षर झालापण कचरा व्यवस्थापनात अडाणीच राहिला.  सद्यस्थितीत घनकचरा व्यवस्थापन -घनकचरा ही एक जागतिक समस्या आहे. जसज...

05/06/2019

5 जून 2015 रोजी पर्यावरण दिना चे औचित्य साधून वेंगुर्ले येथे कचरा मुक्त डंपिंग ग्राउंडचा संकल्प केला अवघ्या चार महिन्यात स्वप्नवत वाटणारी बाब प्रत्यक्षात साकारली हे केवळ कचरा वर्गीकरण हा केंद्रबिंदू मानून घनकचरा ही राष्ट्रीय संपत्ती असून कचऱ्यातील प्रत्येक घटक वस्तू /ऊर्जा निर्मितीचा कच्चा माल आहे व डंपिंग ग्राउंड हे एक पचन संस्था सारखे असावे याची जाणीव निर्माण झाल्यामुळे शक्य झाले .2010 मध्ये दापोली येथे प्लास्टिक मुक्ती , बायोगॅस द्वारे वीजनिर्मिती , कचरा वर्गीकरण इत्यादी विविध प्रयोगातून व स्वअध्यायनातून कचऱ्यातील शून्य गाठण्यात 2 आक्टोबर 2015 मध्ये यश मिळाले .
आजपर्यंत 350 हून अधिक कार्यशाळा /व्याख्याने याद्वारे या संकल्पनेचा प्रसार केला केवळ महाराष्ट्र नव्हे तर भारत देशाच्या सिमा ओलांडून जागतिक पातळी वर कार्याची दखल घेतली गेली .U N D P ने जागतिक स्तरावर अनुकरणीय असल्याचा निर्वाळा दिला "Washigton Post" या अमेरिकन वर्तमानपत्राने दखल घेतली , विविध नियतकालिके , वाहिन्या , वर्तमान पत्र , पाक्षिक , व्याख्यान माला इत्यादी मधून प्रसिद्धी मिळाली इतकेच नव्हे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ लागले म्हणून अभ्यासाचा विषय बनला अनेक अभ्यासक्रमात , Ph.d .साठी अनेक विद्यार्थी हा वेंगुर्ले पँटर्न अभ्यासू लागले .त्यानंतर कर्जत व माथेरान मध्ये यशस्वी अनुकरण केले .या तिन्ही ठिकाणी डंपिंग ग्राउंड कचरा मुक्त असून त्याचे रूपांतर अभ्यास केंद्रात , पर्यटन केंद्रात व करमणूक केंद्रात झाले आहे . माझ्या संकल्पनेतून चार वर्षात(5 जून 2015 ते 5जून 2019) साकारण्यात मला यश मिळाले याचा मला खूप अभिमान वाटतो .
कचरा मुक्त डंपिंग ग्राउंड या संकल्पनेला पर्यावरणीय दृष्ट्या खूप महत्व आहे , कारण हरित गृह वायू जो जागतिक तापमान वाढीस कारणीभूत आहे तो चार प्रतिशत प्रमाणात घनकचरा अयोग्य हाताळणी मुळे उत्सर्जित होतो .आज पर्यंत आम्ही 20000 मे टन कचऱ्यावर
प्रक्रिया करून डंपिंग ग्राउंड वरील लँड फील होणारा कचरा रोखू शकलो .

जळतो आहे कचरा
पेटला आहे देश ॥
दुर्गंधी अन प्रदूषणाने
वाढतो आहे रोष ॥

अशी स्थिती सार्वत्रिक आहे .

घनकचरा व्यवस्थापनाच्या या मनाला आनंददायी व अनेकांना प्रेरणादायी अनुकरणीय यशाला चार वेळा वसुंधरा पुरस्कार , स्वच्छ नगरपरिषद सह सर्वोत्कृष्ट नगरपरिषद असे डझन भराहुन अधिक पुरस्कार मिळाले शासनाने प्रोत्साहन दिले ..शून्य कचरा हा शब्द या शहरांच्या जीवनशैली चा भाग बनला .
यापुढे ही अनेक पुरस्कार मिळतील परंतु लोकांच्या मानसिकतेत झालेला बदल , निसर्गाप्रती , पर्यावरण रक्षणार्थ आलेली सजगता लाख मोलाची वाटते .

या वर्षी जागतिक पर्यावरण दिनाची
"Beat Air Pollution" ही theam आहे.

कचरा मुक्त डंपिंग ग्राउंड या माझ्या प्रयोगाने डंपिंग ग्राउंड वर जाणारा कचरा रोखल्याने जळणाऱ्या डंपिंग ग्राउंड चे चित्र पूर्णपणे थांबले म्हणून उत्सर्जित होणारे विषारी वायू थांबले पर्यायाने वायू प्रदूषण थांबले .

जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!
Think Globaly Act Localy

रामदास तुकाराम कोकरे
मुख्याधिकारी , कर्जत नगरपरिषद

Address

Vengurla
416516

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vengurle Municipal Council posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share