17/04/2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्काराने
संजय मधुकर मुळे सन्मानित
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक संजय मधुकर मुळे यांना नुकतेच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि पुस्तके असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
मानवतावादी सांस्कृतिक चळवळ दीक्षा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने कोल्हापूर येथे दिनांक १३ एप्रिल २०२५ रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सतीशकुमार पाटील, पुणे विभागातील शिक्षक मतदार संघाचे आमदार प्रा. जयंत आसगावकर, ट्रस्टचे अध्यक्ष विश्वासराव तरटे, मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या प्रमुख अंतिमा कोल्हापूरकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या २२ मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आदर्श मानून जनसेवेच्या विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
यापूर्वी संजय मुळे यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला असून यात द एक्सलंसी आयकॉनिक अवॉर्ड आणि फाव अँण्ड फेअर्स यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या "बेस्ट स्पीच ॲण्ड स्पीकर ऑफ द इयर", महाराष्ट्र भूषण जीवन गौरव, उद्योगश्री जीवन गौरव पुरस्काराचा समावेश आहे. याशिवाय नॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्याकडून नॅशनल इंडस्ट्रीयल एक्सलंस पुरस्कार, क्वालिटी ब्रॅण्ड टाईम्स तर्फे क्वालिटी ब्रँड इंडिया पुरस्कार, एज्युकेशन ॲण्ड ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन तर्फे राष्ट्रीय निर्माण रत्न पुरस्कार अशा विविध पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
…