Priyanka Berde BJP

  • Home
  • Priyanka Berde BJP

Priyanka Berde BJP जिल्हा सह-सचिव वसई-विरार शहर का. मोर्चा

हार्दिक अभिनंदन सर्व विद्यार्थ्यांचे👏👏👏
13/05/2025

हार्दिक अभिनंदन सर्व विद्यार्थ्यांचे👏👏👏

📍 युनिटेक,विरार🕐 दिनांक ०९.०५.२०२५गेल्या अनेक दिवसांपासून युनिटेक परिसरात गटारावरील स्लॅब तुटलेल्या अवस्थेत होते. याचा य...
09/05/2025

📍 युनिटेक,विरार

🕐 दिनांक ०९.०५.२०२५

गेल्या अनेक दिवसांपासून युनिटेक परिसरात गटारावरील स्लॅब तुटलेल्या अवस्थेत होते. याचा येथील रहिवासी यांना त्रास सहन करावा लागत होता. तसेच यात लहान मुले पडण्याची शक्यता जास्त होती. या समस्येची दखल घेत सौ प्रियांका अभंग बेर्डे( वसई विरार जिल्हा सह सचिव भारतीय जनता पार्टी का. मो.) ह्यांनी गेल्या १५ दिवसापासून या बाबत सतत पाठपुरावा करून आज दिनांक ०९.०५.२०२५ रोजी तीन ठिकाणावरील स्लॅब ची दुरुस्ती करून घेतली.

यावेळी माझ्या सोबत सौ. नंदिनी पुराडकर देखील उपस्थित होत्या.

भारतीय जनता पार्टी 🧡 सगळ्यांची सात, सगळ्यांचा विकास

🇮🇳 🇮🇳

22/04/2025
📍वसई विरार महानगरपालिका⏱️१७/०४/२०२५वसई विरार महानगरपालिकेच्या आयुक्त दालनात, युनिटेक परिसरात पावसात साचणाऱ्या पाण्याच्या...
21/04/2025

📍वसई विरार महानगरपालिका

⏱️१७/०४/२०२५

वसई विरार महानगरपालिकेच्या आयुक्त दालनात, युनिटेक परिसरात पावसात साचणाऱ्या पाण्याच्या समस्येसंदर्भात पाठपुरावा करण्यासाठी गेले होते. मी दिनांक २७/०३/२०२५ रोजी दिलेल्या पत्राचा पाठपुरावा केला आणि त्याचबरोबर आज पुन्हा एकदा लेखी पत्र सादर केले.

आयुक्तांनी माहिती दिली की:

१. युनिटेक परिसरातील सर्व नाले व रस्त्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
२. दिनांक ९ एप्रिल २०२५ रोजी कन्सल्टंट यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे. येत्या आठवड्यात ते संबंधित कामाचे अंदाजपत्रक (estimate) महानगरपालिकेकडे सादर करतील.
त्यानंतर महानगरपालिका पुढील कार्यवाही सुरू करेल. या संदर्भात महानगरपालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांशी नियमितपणे पाठपुरावा सुरू आहे.

तसेच, आपल्या परिसरात चोरी आणि गुन्हेगारींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्या अनुषंगाने, आयुक्तांना प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत पत्र सादर करण्यात आले. या संदर्भात आयुक्तांनी सहआयुक्त श्री. समीर भुमकर (माहिती तंत्रज्ञान विभाग) यांना आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.

📍युनिटेक, विरार पश्चिमयुनिटेक विरार पश्चिम परिसरात बांगलादेशी लोकांचे प्रमाण खूप वाढले आहे. त्याचा त्रास महिला व मुलींना...
21/04/2025

📍युनिटेक, विरार पश्चिम

युनिटेक विरार पश्चिम परिसरात बांगलादेशी लोकांचे प्रमाण खूप वाढले आहे. त्याचा त्रास महिला व मुलींना होत आहे. https://youtu.be/NWU2Rva6mIk?si=3i_l_omZUSEXAQps

Important news for the citizens of Virar city: The number of Bangladeshi intruders has increased in Unitech Society, Virar East. A Marathi girl was molested....

📍युनिटेक, विरार पश्चिम⏱️०७/०४/२०२५युनिटेक कॉम्प्लेक्स येथे रविवारी दिनांक 6 एप्रिल रोजी पहाटेच्या वेळी गटारावरील झाकणांच...
21/04/2025

📍युनिटेक, विरार पश्चिम

⏱️०७/०४/२०२५

युनिटेक कॉम्प्लेक्स येथे रविवारी दिनांक 6 एप्रिल रोजी पहाटेच्या वेळी गटारावरील झाकणांची चोरी झाली होती. त्यात लहान मुले पडण्याची शक्यता जास्त होती. यावर तत्काळ दखल घेत यांनी सहाय्यक आयुक्त प्रभाग समिती "अ" यांची सकाळी भेट घेऊन,त्वरित झाकणे बदलण्यात आली आहेत.

📍कलेक्टर ऑफीस पालघर⏱️ २८.०३.२०२५कलेक्टर ऑफीस पालघर येथे युनिटेक परिसरात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचते त्याबाबत योग्य त्य...
21/04/2025

📍कलेक्टर ऑफीस पालघर

⏱️ २८.०३.२०२५

कलेक्टर ऑफीस पालघर येथे युनिटेक परिसरात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचते त्याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी, तसेच या परिसरातील इतर समस्याबाबत मंत्री, वने तथा पालकमंत्री, पालघर जिल्हा मा.ना.श्री.गणेशजी नाईक साहेब, यांची भेट घेऊन त्यांना लेखी पत्र दिले.यावर तत्काळ दखल घेत माननीय पालक मंत्री यांनी वसई विरार महानगरपालिकेला तत्काळ कारवाई करण्याबाबत आदेश दिले.
यावेळी माझ्या सहकारी सौ. नंदिनी पुराडकर आणि सौ. अनिता मयेकर देखील उपस्थित होत्या.

📍 वसई विरार महानगरपालिका⏱️दिनांक २७.०३.२०२५ वसई विरार शहर महापालिका मुख्यालय येथे युनिटेक परिसरात दरवर्षी पावसाळ्यात पाण...
20/04/2025

📍 वसई विरार महानगरपालिका

⏱️दिनांक २७.०३.२०२५

वसई विरार शहर महापालिका मुख्यालय येथे युनिटेक परिसरात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचते त्याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी, तसेच या परिसरातील इतर समस्यांबाबत माननीय आयुक्त श्री.अनिलकुमार पवार यांच्या सोबत चर्चा करून लेखी पत्र दिले.यावर तत्काळ दखल घेत माननीय आयुक्त यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना याबाबत योग्य ती कारवाई करण्याबाबत आदेश दिले.

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Priyanka Berde BJP posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share