BalakPalak

BalakPalak FOUNDATION | PRAKASHAN Twitter:

स्टोरीटेल कट्टाआपल्या पुस्तकप्रेमी परिचितांसोबत हा मेसेज नक्कीच शेअर करा.https://youtu.be/nmbxOjESkxQ?si=cztubKMnX2UarvN...
17/07/2026

स्टोरीटेल कट्टा
आपल्या पुस्तकप्रेमी परिचितांसोबत हा मेसेज नक्कीच शेअर करा.

https://youtu.be/nmbxOjESkxQ?si=cztubKMnX2UarvNN

मुलांच्या हातात
योग्य वयात पुस्तके देऊ या..
एक पिढी घडवू या.

आपला अभिप्राय 8856862711 वर कळवू शकता...
Thnx to : Santosh Deshpaande

शाळेतील मुलांमध्ये वाचनाचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि ही पालकांपुढची...

समाजात अनेक विषय सातत्याने चर्चिले जातात. त्याद्वारे व्यक्त केली जात असलेली चिंता प्राधान्याने कानावर येते. यात वरचा नंब...
15/07/2026

समाजात अनेक विषय सातत्याने चर्चिले जातात. त्याद्वारे व्यक्त केली जात असलेली चिंता प्राधान्याने कानावर येते. यात वरचा नंबर लागणारा विषय म्हणजे ‘शिक्षण’. समाज घडण्याच्या प्रक्रियेत शिक्षण जरी खूप मोठी आणि प्रभावी भूमिका बजावत असले, तरी शिक्षण आणि समाज यांचे समोर येत असलेले असे नाते हासुद्धा एक चिंतनाचा विषय आहे. ही परिस्थिती केवळ आजची नसून यालासुद्धा एक परंपरा आहे आणि या परंपरेचा दुवा ठरलेले ‘शिक्षण आणि सामाजिक व्यवस्था’ हे अनुवादित पुस्तक नुकतेच हातात पडले. ख्यातनाम विचारवंत आणि प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ रसेल यांचे हे पुस्तक केवळ १८० पानांचे एक छापील पुस्तक नसून, समाज आणि शिक्षण यांच्या परस्परातील नात्यांची उकल करणारा प्रवाही संवाद आहे. अर्थात, हा पुस्तकरूपी मूळ संवाद जरी इंग्रजी भाषेत असला तरी मराठी भाषेत अनुवादित करणाऱ्या अनुवादकानेसुद्धा तो जसाच्या तसा प्रवाही ठेवत आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. अनुवादकाचे हे कसब पानोपानी दिसते आणि थोडासा बाजूला पडलेला विषय हातात घेण्याचा प्रकाशकाचा प्रयत्न कौतुकास पात्र वाटतो.
खरे तर स्वतःच्या पहिल्या श्वासापासून अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मनुष्यप्राणी शिकत असतो, घडत असतो. प्रत्येक क्षणी समाज त्याला ‘माणूस’ म्हणून घडवत असतो तर व्यवस्था त्याला ‘नागरिक’ घडवू पाहत असते आणि हे दोन्ही घटक त्यासाठी शिक्षणाचा आधार घेतात. सोपे, प्रभावी आणि त्याहीपेक्षा परिणामकारक माध्यम म्हणून शिक्षणाकडे पहिले जाते. माणूस म्हणून घडताना आणि तेव्हाच नागरिक म्हणून घडताना कधी कधी त्याची ससेहोलपटही होते. फक्त यातील एक जमेची बाब म्हणजे शिक्षणाचा हेतू स्वच्छ व शुद्ध असतो. कधी ते औपचारिक असते तर कधी अनौपचारिक. कर्तव्य, अधिकार आणि जबाबदारी या तिन्ही अंगाने शिक्षणप्रवास सुरू असतो. आनुवंशिकता, सभोवताल, पार्श्वभूमी यासारख्या अनेक बाबी यात असतात आणि त्या आपापली ठोस भूमिका बजावत असतात. या सर्वांची रसेल यांनी आपल्या पद्धतीने मांडणी करीत असताना टिपलेली निरीक्षणे उदाहरण म्हणून दिली असली आणि ती त्या काळची असली तरी वाचक म्हणून आपण ती आत्ताच्या काळाला जोडू शकतो. ते कसब असणारा शिक्षणप्रेमी या पुस्तकाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही.
अनुवादकाने मराठीत अनुवादित केलेले आणि प्रकाशकाने प्रकाशित केलेले रसेल यांचे हे विचार अजून सखोलपणे जाणून घेण्यासाठी एकदा तरी हे पुस्तक हातात घेतलेच पाहिजे. व्यक्तित्व आणि नागरिकत्व यातील सलोखा राखण्यासाठी ठोस भूमिका कोण बजावतो , या प्रश्नाचे उत्तर यात सापडेल हे निश्चित.

-विनायक जोशी,
बालक पालक डेशन,पुणे-४१.

पुस्तक : शिक्षण आणि सामाजिक व्यवस्था
लेखक : बर्ट्रांड रसेल
अनुवाद : केदार वाघ
प्रकाशक : सनय प्रकाशन, जुन्नर, जि. पुणे.
पृष्ठ संख्या : १८० /किंमत : २५०/-

03/03/2026
17/12/2025

A very interesting and novel experiment in a School...!!! 👌👍👋🌹

Address

Sinhgad Road, Pune
Wakad
411041

Alerts

Be the first to know and let us send you an email when BalakPalak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to BalakPalak:

Shortcuts

Share

Category