15/12/2025
📅. १५/१२/२०२५ 🕛. दुपारी. १२:००
📍. श्री क्षेत्र केळझर, ता. सेलू, जि. वर्धा.
आपल्या सर्वांच्या अथक मेहनतीमुळे २०२४ च्या निवडणुकीत आपण १०० टक्के यश संपादन केले.
सर्व विधानसभा मतदारसंघ जिंकल्यानंतर आज वर्षपूर्तीनिमित्त आज भारतीय जनता पार्टी, वर्धा जिल्हा तर्फे पदाधिकारी स्नेहमिलन व केळझर येथे महाआरती करण्यात आली. पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी व समर्थक यांच्या योगदानामुळेच हा विजय शक्य झाला, याची जाणीव करून देणारा हा सोहळा होता.
एकतेची ताकद, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जनतेचा विश्वास यामुळेच भाजपाचा विजयाचा प्रवास अधिक भक्कम होत आहे. आगामी काळातही जनसेवेचा हा संकल्प अधिक दृढ करत विकासाच्या वाटेवर आपण सर्वजण एकत्र चालत राहू, हाच निर्धार या निमित्ताने व्यक्त करण्यात आला.
राज्यमंत्री तथा पालकमंत्री वर्धा जिल्हा मा. ना. श्री. डॉ. पंकजजी भोयर, विदर्भ विभागीय संघटन मंत्री श्री. उपेंद्रजी कोठेकर, माजी खासदार श्री. रामदासजी तडस, माजी खासदार श्री. सुरेशजी वाघमारे, विधान परिषद आमदार श्री. दादारावजी केचे, माजी जिल्हाध्यक्ष श्री. सुनीलजी गफाट, भाजपा ज्येष्ठ नेते श्री. किशोरजी दिघे, भाजपा ज्येष्ठ नेते श्री. सुधीरजी दिवे, जिल्हा कोषाध्यक्ष श्री. भूपेंद्रजी शहाणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराजजी शिंदे, माजी महामंत्री सौ. अर्चनाताई वानखेडे, श्री. मिलिंदजी भेंडे, जिल्हा महामंत्री श्री. कमलाकरजी निंभोरकर, जिल्हा महामंत्री श्री. अशोकजी कलोडे, जिल्हा महामंत्री श्री. आकाशजी पोहाणे, श्री. संदीपजी काळे, सेलू तालुका अध्यक्ष श्री. प्रफुलजी खोडे सह सर्व जिल्हा प्रमुख पदाधिकारी, सर्व मंडळ अध्यक्ष, सर्व मंडळ महामंत्री, मंडळ पदाधिकारी, महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.