02/07/2026
आज दिनांक २ जुलै २०२६ रोजी वर्धा तालुका व जिल्ह्यातील आंजी (मोठी ) ह्या ग्रामपंचायत मध्ये VB -G RAM-G योजनेचा शुभारंभ करण्यात आला. सदर कार्यक्रमास जिल्ह्याचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प., मा. उपजिल्हाधिकारी रोहयो, मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), मा. गट विकास अधिकारी पं. स. वर्धा , सा. गट विकास अधिकारी , विस्तार अधिकारी, जिल्हा, MIS समन्वयक , सा. कार्यक्रम अधिकारी (सर्व) तांत्रिक अधिकरी (सर्व) , तालुकास्तरीय व इतर जिल्हास्तरीय अधिकारी आणि कर्मचारी तथा सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक , तलाठी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
विकसित भारत - रोजगार आणि अजीविका हमी मिशन (ग्रामीण) (विकसित भारत जी राम जी) कायदा,2025 अंमलबजावणी व प्रचार प्रसिद्धी बाबत उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली. त्यामध्ये पूर्वीची रोजगार हमी मनरेगा कायदा 2005 व आता विकसित भारत जी रामजी कायदा 2025 मध्ये काय बदल झालेले आहे. त्याची अंमलबजावणी दिनांक 1 जुलै 2026 असून संपूर्ण भारतामध्ये अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याचे उद्देश, वैशिष्ट्य इत्यादी उपस्थित त्यांना समजून सांगण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते VB G RAM G योजने अंतर्गत वृक्ष लागवड कामाचे उद्घाटन करण्यात आले.