11/08/2022
दिनांक 10/8/ 2022 ला बहुजन हिताय वसतिगृह सावंगी मेघे, वर्धा येथे गावागावातून शहरांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या सर्व ग्रामीण ,गरीब व अनेक जातीच्या विद्यार्थ्यांसमोर 'घर घर झेंडा तो घरघर संविधान' या मोहिमे अंतर्गत संविधानाचा अर्थ, संविधानाची गरज व संविधानाची कृतीशीलता विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात अवलंबावी यासाठी होमवर्क देऊन संविधान पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. प्रा. नूतन माळवी यांनी मुलांना मार्ग दर्शन केले त्याप्रसंगी धम्मचारी हर्षविर, वज्रमनी व शारदा रोकडे व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजार होते.