Wardha Collectorate

Wardha Collectorate This is the official page of Collector office,Wardha. It is the interactive face of district administration for citizens.

20/10/2021

चित्रपटगृह, नाटयगृह व सांस्कृतिक कार्यक्रमास परवाणगी

वर्धा, दि 20 :-( जिमाका) कोविड नियमाच्या अटी व शर्तीच्या अधिन राहून चित्रपटगृह, बंदिस्थ सभागृह, मोकळया जागेत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, नाटयगृहास परवाणगी देण्यात आली आहे.
चित्रपटगृह, नाटयगृह व सांस्कृतिक कार्यक्रम स्थळी काम करणा-या कर्मचा-यांची आणि चित्रपटगृह, नाटयगृह आणि सभागृहात प्रवेश करणा-या प्रेक्षकांच्या लसीकरणाच्या दोन मात्रा झालेल्या असाव्यात. दुसरी मात्र घेऊन 14 दिवस पुर्ण झालेले असणे आवश्यक आहे. 18 वर्षा खालील मुलांचे लसीकरण अदयाप सुरु न झाल्याने या वयोगटातील मुलांनी चित्रपटगृह व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रवेशासाठी पालकाचे समंतीपत्र, वयाचा पुरावा, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा वयाचा उल्लेख असलेले शाळा, महाविद्यालयाचे वैध ओळखपत्र असणे आवश्यक आहे
राज्य शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना व अटी व शर्तीचे पालन करण्याच्या अधिन राहून सदर चित्रपटगृह, खुले, बंदिस्थ व सांस्कृतिक सभागृह सुरु करण्यास परवाणगी देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
000
प्र.प.क्र -744 दि.20.10.2021
अभिमत, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापिठे व महाविद्यालये
आपल्या स्तरावरुन सुरु करण्याकरीता परवाणगी
वर्धा, दि 20 :-( जिमाका) राज्यातील अकृषी विद्यापिठे, अभिमत विद्यापिठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापिठे व त्यांच्या सलग्नीत महाविद्यालयातील नियमित वर्ग सुरु करण्यासाठी आपल्या स्तरावरुन कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आज दिल्या.
विद्यापिठ, महाविद्यालयांचे वर्ग 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेने सुरु करण्याबाबत विद्यापिठांनी निर्णय घ्यावा. 18 वर्षावरील विद्यार्थी ज्यांनी कोव्हिड 19 च्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. अशाच विद्यार्थी व विद्यार्थींनीना महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील. प्रतिबंधित प्रक्षेत्रात येणारी कोव्हिड 19 च्या आजाराचा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव व स्थानिक परिस्थिती, प्रतिबंधित प्रक्षेत्राचे नियोजन व पायाभूत सुविधांची उपलब्धता या बाबी विचारात घेऊन विद्यापिठे व विद्यापिठांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा. विद्यापिठे व त्यांच्याशी संलग्नीत महाविद्यालयांनी कोव्हिड 19 च्या व्यवस्थापनाबाबचे राष्ट्रीय निर्देश, कामांच्या ठिकाणाबाबचे अतिरिक्त निर्देश, राज्य शासनाने वेळोवेळी काढलेली मार्गदर्शक तत्वे किंवा मानक कार्यप्रणाली तसेच विद्यापिठ अनुदान आयोगाने वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शक सूचना लागू राहतील. ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात उपस्थित राहता येणार नाही त्यांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दयाव्या.
वसतीगृह टप्प्या-टप्प्याने सुरु करण्याबाबत संचालक उच्च व तंत्रशिक्षण यांच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करावी. ज्या विद्यार्थी व विद्यार्थीनी कोव्हीड 19 ची लस घेतलेली नाही त्यांच्याकरीता विद्यापिठाने संबंधित संस्थांचे प्रमुख व महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या मदतीने लसीकरणासाठी विशेष मोहिम राबवून लसीकरण प्राधान्याने करुन घ्यावे. तसेच विद्यापिठ व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-याचे देखील प्राधान्याने लसीकरण करुन घ्यावे.
या परिपत्रकांचे उल्लघन करणा-यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी कळविले आहे.
00000

विविध प्रकल्पाच्या भूसंपादनाचा जिल्हाधिका-यांनी घेतला आढावावर्धा, दि 20 ( जिमाका) :जिल्हयात विविध प्रकल्पासाठी भूसंपादना...
20/10/2021

विविध प्रकल्पाच्या भूसंपादनाचा जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा
वर्धा, दि 20 ( जिमाका) :जिल्हयात विविध प्रकल्पासाठी भूसंपादनाची कार्यवाही करण्यात येत असून या भूसंपादनाच्या प्रगतीचा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आढावा घेतला. प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश त्यांनी यावेळी भूसंपादन अधिकां-यांना दिले.
जिल्हयात वर्धा नांदेड रेल्वे लाईन, वर्धा-बल्लारशा व वर्धा- नागपूर या दोन मार्गाची तिसरी लाईन व वर्धा- नागपूर या मार्गाच्या चौथ्या लाईनसाठी भूसंपादन सुरु आहे. काही तालुक्यातील भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून ज्या तालुक्यांमधील भूसंपादनाची कारवाही तातडीने करावी असे निर्देश त्यांनी दिले. जलसिंचन प्रकल्पांचा प्रकल्पनिहाय त्यांनी आढावा घेतला. त्यात निम्न वर्धा प्रकल्प, निम्न वर्धा कालवे, कार नदी प्रकल्प, शिरुड प्रकल्प, सुकळी प्रकल्प, मध्यम प्रकल्प हातगाव बॅरेजचा भूसंपादनाचा आढावा घेतला.
जिल्हयातून जाणा-या राष्ट्रीय महामार्गसाठी भूसंपादन केल्या जात असलेल्या प्रकरणांचीही त्यांनी माहिती घेतली. यावेळी उपजिल्हाधिकारी मनोज खैरनार, प्रविण महिरे, नितीन पाटील, जिल्हा पुनर्वसन अधिकारी रविंद्र जोगी, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख प्रमोद ठुबे आदी उपस्थित होते.

शेतक-यांनी पेरणीपूर्वी माती परिक्षण करावे                     -खासदार रामदास तडसकृषि पदर्शन व मेळाव्याचा समारोपमेळाव्यात...
20/10/2021

शेतक-यांनी पेरणीपूर्वी माती परिक्षण करावे
-खासदार रामदास तडस
कृषि पदर्शन व मेळाव्याचा समारोप
मेळाव्यात 23 लाखांची उलाढाल
वर्धा, दि 20 ( जिमाका) : आपल्या शेतात कोणती पिके चांगल्या पध्दतीने घेतल्या जाऊ शकतात याची माहिती शेतक-यांना असणे आवश्यक आहे. यासाठी माती परिक्षण करणे उपयुक्त असून प्रत्येक शेतक-याने माती परिक्षण करुनच आपली पिक पध्दती ठरविली पाहिजे, असे खासदार रामदास तडस यांनी सांगितले.
तीन दिवसीय शाश्वत शेती तंत्रज्ञान प्रदर्शन व शेतकरी मेळाव्याच्या समारोप प्रसंगी खा. श्री. तडस बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन वर्धा पंचायत समितीचे सभापती महेश आगे, माजी जिल्हा परिषद मिलींद भेंडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, पंचायत समिती सदस्य महानंदा ताकसांडे, आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर, अग्रणी बँकेंचे जिल्हा व्यवस्थापक वैभव लहाने, उपविभागीय कृषि अधिकारी अजय राऊत आदी उपस्थित होते.
शेतक-यांनी माती परिक्षण केल्यास लागवडीचे योग्य नियोजन करता येते त्यामुळे प्रत्येकांनी सदर परिक्षण केलेच पाहिजे. ब-याच वेळा पिक काढणीला आले असतांना कृषी मालाचे भाव एकदम कमी होतात. हे नुकसान टाळण्यासाठी शेतक-यांनी आपला माल गोदामात ठेवला पाहिजे. केंद्र शासनाची कोल्ड स्टोरेजची योजना असून या योजनेतून जास्तीत जास्त माल साठवण गोदाम निर्माण झाले पाहिजे असे पुढे बोलतांना श्री तडस यांनी सांगितले.
विदर्भातील शेतकरी कष्टाळू आहे त्याला योग्य मार्गदर्शन व शासकिय मदत लाभल्यास तो स्वत: स्वयंपूर्ण होऊ शकतो. आपल्याकडे जंगली जनावरांचा फार त्रास आहे. यासाटी केंद्र व राजय शासनाने अनुदानावर शेत कुंपण योजना राबवावी यासाठी आपले प्रयत्न सुरु आहे. मेळाव्याच्या माध्यमातून शेतक-यांना नविन तंत्रज्ञान अवगत होते. त्यामुळे ग्रामीण भागातही असे मेळावे व्हावेत, असे श्री तडस म्हणाले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर यांनी मेळाव्यात
कृषि व संलग्न विषयावर तीन दिवस तज्ञांचे बारा मार्गदर्शन संत्र आयोजित करण्यात आले. विविध प्रकारचे 27 स्टॉल लावण्यात आले तर मेळाव्या दरम्यान 23 लाखांची उलाढाल झाली असल्याचे सांगितले. यावेळी मोनिका सुर्यवंशी, वैभव रत्नपारखी यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. लॉनडाऊनच्या काळात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शेतक-यांचा यावेळी सत्कारही करण्यात आला.
0000

20/10/2021

वर्धा कोरोना अपडेट

दि 20 ऑक्टोबर 2021

24 तासात झालेल्या चाचण्या- 50

आजचे एकूण पॉझिटिव्ह - 0

वर्धा जिल्हा पॉझिटिव्ह - 0

इतर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह -0

आज आयसोलेशन मध्ये असलेले एकूण - 2

आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी पाठवलेले एकूण स्त्राव नमुने 456949

अहवाल प्राप्त - 456949

निगेटिव्ह -403923

प्रलंबित अहवाल- 0

जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित संख्या - 49401

आज कोरोनामुक्त- 0

एकूण कोरोनामुक्त - 48069

आज एकूण मृत्यू -0

वर्धा जिल्हा मृत्यू- 0

एकूण मृत्यू 1326

ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह - 2

20/10/2021

अनुसुचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी स्टॅडअप इंडिया योजना
 लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे सामाजिक न्याय विभागाचे आवाहन

वर्धा, दि. 20 :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त स्टॅडअप इंडिया ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे वतीने करण्यात आले आहे.
या योजने अंतर्गत 1 लक्ष 25 हजार अनुसुचित जाती, अनुसुचित जमातीचे उद्योजक आणि 1 लक्ष 25 हजार महिला उद्योजक आगामी तीन वर्षात निर्माण करण्यात येणार आहे. देशातील 27 सरकारी बँकांच्या सहकार्याने सदर स्टॅडअप योजना राबविण्यात येणार येत आहे. यासाठी केंद्र शासनाने 10 कोटी रुपयाची तरतुद केली असून सीडीबी कडे वर्ग करण्यात आली आहे. सीडीबी मार्फत लाभार्थ्यांना कर्जाच्या रक्कमेची हमी मिळणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी व्यवसायासाठी स्टॅडअप इंडिया या योजनेचा लाभ घ्यावा, असे, आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण प्रसाद कुळकणी यांनी केले आहे
केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया या योजनेचा लाभ घेणा-या लाभार्थ्यांना एकुण प्रकल्प किमतीच्या 25 टक्के हिस्सा भरावा लागणार असल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील अनुसुचित जातीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील नव उद्योजक लाभार्थ्यांची मार्जीन मनी भरण्याची क्षमता नसल्यामुळे नवउद्योजक लाभार्थ्यांना एकुण प्रकल्प किमतीच्या लाभार्थ्यांच्या हिस्स्यातील 25 टक्के मधील जास्ती जासत 15 टक्के मार्जीन मनी महाराष्ट शासन उपलब्ध करुन देणार आहे. त्यामुळे नवउद्योजकांना स्वहिस्स्याच्या 10 टक्के भरणा केल्यानंतर व बँकेंने अर्जदारास स्टँडअप इंडिया अंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर 15 टक्के राज्य शासनामार्फत सवलत मिळणार आहे.
स्टँडअप इंडिया योजनेचा लाभ घेणारा लाभार्थी राज्यातील अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील असावा. लाभार्थ्यांने आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्या नावे अनुदानासाठी मागणीपत्र विहित केलेल्या विवरणपत्रात सादर करणे आवश्यक आहे. बँकेचे कर्ज मंजुरीपत्र आयुक्त समाज कल्याण कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त् समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा असे, समाज कल्याण विभागाने कळविले आहे.
00000

रेशिम, दुग्ध व्यवसाय व कमी खर्चाच्या  शेतीबाबत शेतक-यांना  मार्गदर्शनदुस-या दिवशीही प्रदर्शन दालनांना  शेतकऱ्यांच्या भेट...
20/10/2021

रेशिम, दुग्ध व्यवसाय व कमी खर्चाच्या शेतीबाबत शेतक-यांना मार्गदर्शन
दुस-या दिवशीही प्रदर्शन दालनांना शेतकऱ्यांच्या भेटी
विविध चर्चासत्रांस शेतकऱ्यांची उपस्थिती

वर्धा, दि. 20 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित तीन दिवशीय शेतकरी मेळाव्यात दुस-या दिवशी रेशिम शेती, दुग्धव्यवसाय व कुकुटपालन,कमी खर्चात शेती व कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन या विषयावर तीन सत्रात विविध वक्त्यांनी चर्चासत्रात सहभाग नोंदवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. असंख्य शेतकऱ्यांनी या मार्गदर्शन सत्रांचा लाभ घेतला. तर दिवसभर स्टॅालला शेतकऱ्यांनी भेटी दिल्या.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा वर्धा मार्फत शाश्वत शेती तंत्रज्ञान प्रदर्शन व शेतकरी मेळाव्याच्या दुस-या दिवशी (19 ऑक्टोबर) विविध विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. चर्चासत्राच्या प्रथम सत्रात अजय वासनिक यांनी रेशीम उद्योगाचे बारकावे, रेशीम विभागाच्या विविध योजना, महारेशीम अभियान,रेशीम कीटकांचे संगोपन करताना घ्यावयाची काळजी, रेशीम कोष विक्रीचे पर्याय या बाबीवर मार्गदर्शन केले.
व्दितीय सत्रात पशुधन विकास अधिकारी डॉक्टर खेमलापुरे यांनी दुग्ध व्यवस्थापन व परस बागेतील कुक्कुटपालन, विविध शासकीय योजना तर पशुधन विकास अधिकारी डॉ. मेघा वनकर, यांनी शेळीपालन व्यवस्थापन या विषयावर मार्गदशन केले.
आत्माच्या , प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर यांनी शाश्वत शेती म्हणजे काय, जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन, कमी खर्च करुन शेती व्यवस्थापन, कापूस पिकावरील गुलाबी बोन्ड अळी व्यवस्थापन व नियंत्रण, कामगंध सापळे वापर, बोन्डसड या विषयावर, खादी ग्रामोद्योग पर्यवेक्षक आर. पी. मनोहरे यांनी मधु मक्षिका पालन योजना व व्यवसाय संधी, प्रगतशील शेतकरी रोहित रत्नपारखी यांनी मधुमक्षिका पालन व्यवसाय कार्यानुभव व्यक्त केले. चर्चासत्राचे शेवटी जिल्हा अग्रणी बँके जिल्हा व्यवस्थापक वैभव लहाने, यांनी पीक विमा, एक जिल्हा एक वाण योजना, कृषी पायाभूत विकास या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे संचालन गट तंत्रज्ञान व्यवस्थापक निरंजन वराडे यांनी केले शेतकरी मेळाव्यास मोठ्या प्रमाणात शेतकरी बंधू-भगिनींनी सहभाग दर्शविला.
00000

11/09/2021

#जिल्हाप्रशासन वर्धा यांच्यावतीने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या #प्रकाशवाटा या सदरात #14 सप्टेंबर रोजी #दुपारी 2वाजता चौथ्या सत्रात युवा आयकॉन #प्रांजल पाटील (आय ए एस) आपल्याला विशेष मार्गदर्शन करणार आहेत.

पाहायला विसरू नका

District Information Office Wardha च्या युट्युब चॅनेलवर
खालील लिंक वर क्लिक करा आणि पहा लाईव्ह

https://youtu.be/XmjZnulLtzQ

03/09/2021

#माहितीचीमालिका #7
मानव अधिकाराबरोबरच #बालअधिकार हा आपल्या समाजातील मुलांसाठी तेवढाच महत्वाचा आहे. बालकांचे हक्क, अधिकार काय आहेत, त्यांचं भावविश्व समजून घेताना सांगड घालू या कायद्याची आणि आपल्या भूमिकेची....

 #दिशाकरिअरच्या   #सत्रतीसरेइयत्ता   #12 वी नंतर विद्यार्थ्यांना  #करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मात्र नेमके कोणत्या ...
27/08/2021

#दिशाकरिअरच्या #सत्रतीसरे

इयत्ता #12 वी नंतर विद्यार्थ्यांना #करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मात्र नेमके कोणत्या क्षेत्राकडे वळावे याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम असतो. याबाबत विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या #दिशाकरिअरच्या या मालिकेत तिसऱ्या सत्रात
उद्या दि #28ऑगस्ट2021 रोजी #सकाळी11 वाजता #विधी क्षेत्रातील करिअरच्या संधी याबाबत माहिती देतील ऍड. डॉ. अशोक पावडे....

विद्यार्थ्यांनो पाहायला विसरू नका
District Information Office Wardha यांच्या
यु ट्यूब चॅनेल वरून उद्या 11 वाजता लाईव्ह ...
खालील लिंकवर क्लीक करा

27/08/2021

#माहितीचीमालिका #6
मानव अधिकाराबरोबरच #बालअधिकार हा आपल्या समाजातील मुलांसाठी तेवढाच महत्वाचा आहे. बालकांचे हक्क, अधिकार काय आहेत, त्यांचं भावविश्व समजून घेताना सांगड घालू या कायद्याची आणि आपल्या भूमिकेची....

Address

Collector Office, Civil Line
Wardha
442001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wardha Collectorate posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Wardha Collectorate:

Share