MP Pratibha Dhanorkar

MP Pratibha Dhanorkar Member of Parliament.
13, Chandrapur-Wani-Arni Constituency.

वाढदिवस अभिष्टचिंतन!सरकार ग्रुप वरोराचे अध्यक्ष व बाळूभाऊ मित्र परिवारातील सदस्य काशिफ खान आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक...
20/08/2026

वाढदिवस अभिष्टचिंतन!

सरकार ग्रुप वरोराचे अध्यक्ष व बाळूभाऊ मित्र परिवारातील सदस्य काशिफ खान आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आपणांस उत्तम आरोग्य व यशस्वी दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा.

📍 चंद्रपूर देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सद्भावना दिनाच्या कार्यक्रमास राजीव ...
20/08/2026

📍 चंद्रपूर

देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सद्भावना दिनाच्या कार्यक्रमास राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी, चंद्रपूर येथे उपस्थित राहून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

स्वर्गीय राजीवजी गांधी यांनी आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी दिलेले योगदान आणि सामाजिक सलोख्याचा संदेश आजही आपल्याला प्रेरित करतो. समाजात शांतता, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मता कायम राखणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री. सुभाष धोटे, श्री. शफिक अहमद साहेब, श्री. विनोद दत्तात्रय, श्री. सुरेंद्र अडबाले, श्री. शिवा राव, सौ. कुंदाताई जेणेकर, सौ. चंदाताई वैरागडे तसेच प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक, पक्षाचे कार्यकर्ते, महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारताच्या तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्रांतीचे शिल्पकार, भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय राजीवजी गांधी यांना जयंत...
20/08/2026

भारताच्या तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्रांतीचे शिल्पकार, भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय राजीवजी गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

काळाच्या पुढे पाऊल टाकत खऱ्या अर्थाने डिजिटल इंडियाचा पाया रचणारे दूरदर्शी नेतृत्व म्हणजे स्वर्गीय राजीवजी गांधी. संगणक आणि तंत्रज्ञान क्रांती, पंचायतराज व्यवस्थेचे सक्षमीकरण, युवकांना १८ व्या वर्षी मतदानाचा अधिकार आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या ऐतिहासिक निर्णयांतून त्यांनी आधुनिक भारताचा मजबूत पाया रचला. देशाच्या प्रगतीसाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणीय आहे.

📍बल्लारपूर, चंद्रपूरबलारपूर क्षेत्रातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटे...
19/08/2026

📍बल्लारपूर, चंद्रपूर

बलारपूर क्षेत्रातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) प्रशासनासोबत महत्वपूर्ण बैठक पार पडली.

सदर बैठकीत पवनी खुर्द, चिंचोली खुर्द, धोपताला, सास्ती, गोयेगांव, गौवरी व खैरगांव या गावांतील भूधारकांच्या भूसंपादनातून सुटलेल्या जमिनी, त्यांना मिळणारा मोबदला आणि पुनर्वसनाबाबत चर्चा करण्यात आली. स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी व पुनर्वसनाचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, यावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. सुभाष धोटे, राजुरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री. अरुण धोटे जी, महिला जिल्हा अध्यक्षा सौ. कुंदाताई जेणेकर, तहसीलदार, विस्तार अधिकारी, PWD विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि WCL चे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

📍 जनसंपर्क कार्यालय, वणी मारेगाव नगरपंचायतचे कार्यक्षम नगरसेवक श्री. नंदेश्वर आसुटकर यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा...
19/08/2026

📍 जनसंपर्क कार्यालय, वणी

मारेगाव नगरपंचायतचे कार्यक्षम नगरसेवक श्री. नंदेश्वर आसुटकर यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. मारेगाव शहरातील जनहिताचे कार्य असो किंवा नागरिकांचे प्रश्न असोत, प्रत्येक कार्यात आपला नेहमीच पुढाकार असतो.

आपले समाजकार्य अधिक जोमाने पुढे सुरू राहो, या सदिच्छेसह आपणांस उत्तम आरोग्य आणि यशस्वी दीर्घायुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

वाढदिवस अभिष्टचिंतन!काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे वरोरा शहराध्यक्ष फिरोजभाई पठाण यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर...
19/08/2026

वाढदिवस अभिष्टचिंतन!

काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे वरोरा शहराध्यक्ष फिरोजभाई पठाण यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

आपल्या हातून अशीच निरंतर जनसेवा, सामाजिक कार्य आणि गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचे कार्य अविरत घडत राहो. तसेच आपणांस उत्तम आरोग्य व यशस्वी दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा.

वाढदिवस अभिष्टचिंतन!मारेगाव नगर पंचायत चे नगरसेवक श्री. नंदेश्वर आसुटकर आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!आपणांस उत्त...
19/08/2026

वाढदिवस अभिष्टचिंतन!

मारेगाव नगर पंचायत चे नगरसेवक श्री. नंदेश्वर आसुटकर आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपणांस उत्तम आरोग्य, यशस्वी दीर्घायुष्य आणि सुख-समृद्धी लाभो. आपले समाजसेवा आणि जनहितासाठीचे कार्य अधिक जोमाने पुढे सुरू राहो, हीच सदिच्छा!

📍 चंद्रपूरनगरसेवक राहुल चौधरी यांच्या वतीने आयोजित कौटुंबिक सोहळ्यात उपस्थित राहून लहानग्या किद्रायच्या ‘अन्नप्राशन’ कार...
18/08/2026

📍 चंद्रपूर

नगरसेवक राहुल चौधरी यांच्या वतीने आयोजित कौटुंबिक सोहळ्यात उपस्थित राहून लहानग्या किद्रायच्या ‘अन्नप्राशन’ कार्यक्रमात त्याला प्रेमाने पहिला घास भरविला. या आनंदमयी सोहळ्यात कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरील आनंद अनुभवताना या सुंदर कौटुंबिक क्षणाचा भाग होता आले, याचा मनापासून आनंद वाटला.

लहान मुलांचे निरागस हसू आणि त्यांच्या गोड हालचाली घरातील वातावरणात एक वेगळाच आनंद आणि जिव्हाळा निर्माण करतात. किद्रायच्या आयुष्यातील या खास प्रसंगी त्याला मनःपूर्वक आशीर्वाद दिले.

बाळ किद्रायला उत्तम आरोग्य, आनंदी आणि निरोगी आयुष्य लाभो तसेच त्याचे भविष्य उज्ज्वल आणि सुखसमृद्धीने भरलेले असो, याच मनापासून शुभेच्छा!



📍पोंभुर्णा आज पोंभुर्णा शहर व ग्रामीण काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित कार्यकर्ता आढावा बैठकीला उपस्थित राहून विविध स्थानिक सम...
18/08/2026

📍पोंभुर्णा

आज पोंभुर्णा शहर व ग्रामीण काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित कार्यकर्ता आढावा बैठकीला उपस्थित राहून विविध स्थानिक समस्यांवर आणि पक्षाच्या संघटनात्मक वाटचालीवर विस्तृत चर्चा केली.

या बैठकीत मुख्यतः SIR व BLA यांच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये मतदार यादीचे पुनर्निरीक्षण करणे, वॉर्डनिहाय मतदार याद्यांची तपासणी करणे, चुकीची नावे वगळणे आणि नवीन पात्र मतदारांच्या नावांचा समावेश व दुरुस्ती करणे या अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रियेवर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी सरपंच रोहिणीताई नैताम, श्री.विनोद अहिरकर श्री. प्रविण पिदुरकर, श्री. विनोदभाऊ थेरे, श्री. वसंत पोटे, श्री. राकेश नैताम, सोमेश्वर कुंघेजवार, श्री. मुरलीधर टेकाम, मंगेश उपरे, श्री ऋषी पोलेलवार, श्री. अनिल पाल, मडावी सर, श्री. देवेंद्र आर्या, श्री. राहुल चौधरी, श्री. भास्कर माकोडे, श्री.प्रशांत बुधरण, श्री.दिवू रणदिवे तसेच काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाढदिवस अभिष्टचिंतन! यवतमाळ जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस व व्यापारी संघटनेचे सचिव श्री. दुष्यंत जयस्वाल  यांना वाढदिवसाच्य...
18/08/2026

वाढदिवस अभिष्टचिंतन!

यवतमाळ जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस व व्यापारी संघटनेचे सचिव श्री. दुष्यंत जयस्वाल यांना वाढदिवसाच्या हादिॅक शुभेच्छा!

राजकीय व सामाजिक क्षेत्रातील आपले कार्य, जनसेवेप्रती असलेली बांधिलकी कायम वृद्धिंगत होत राहो. आपणांस उत्तम आरोग्य व यशस्वी दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

Address

Surykiran, Laxmi Nagar, Abhyankar Ward
Warora
442907

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MP Pratibha Dhanorkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share