जिल्हा माहिती कार्यालय, वाशिम

  • Home
  • India
  • Washim
  • जिल्हा माहिती कार्यालय, वाशिम

जिल्हा माहिती कार्यालय, वाशिम जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकृत फेसबुक पेज

🌺 महाराष्ट्राचा राज्य उत्सव – “महागणेशोत्सव” २०२६! 🌺11 सप्टेंबरपर्यंत सुसंधी...त्वरित अर्ज करा...महाराष्ट्राच्या सांस्कृ...
06/09/2026

🌺 महाराष्ट्राचा राज्य उत्सव – “महागणेशोत्सव” २०२६! 🌺
11 सप्टेंबरपर्यंत सुसंधी...त्वरित अर्ज करा...

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा आणि गणेशोत्सवाच्या परंपरेचा गौरव करणाऱ्या महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ मध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी! 🪔✨

🏆 आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पारितोषिकांसाठी स्पर्धा!

📅 अर्ज करण्याची अंतिम तारीख – ११ सप्टेंबर २०२६
📝 ऑनलाइन अर्ज करा: ganeshotsav.pldmka.co.in

🌿 पर्यावरणपूरक गणेशोत्सव • सामाजिक उपक्रम • स्वच्छता व सुरक्षितता • आकर्षक सजावट • डिजिटल माध्यमांचा सकारात्मक वापर • शिस्तबद्ध आयोजन

🙌 आपला सहभाग, महाराष्ट्राचा अभिमान!
गणेशोत्सवाची परंपरा जपूया… संस्कृतीचा वारसा पुढे नेऊया! ❤️🚩

#महागणेशोत्सव #गणेशोत्सव२०२६ #गणेशोत्सवमंडळस्पर्धा #महाराष्ट्राच्याराज्यउत्सव #महाराष्ट्र गणपतीबाप्पामोरया PLDeshpandeKalaAcademy MaharashtraCulture Ganeshotsav2026

🌺 उमरी खुर्दमध्ये भक्तीचा जागर! 🌺मंत्री ना.श्री.संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत जन्माष्टमीचा धार्मिक सोहळा उत्साहात ...
05/09/2026

🌺 उमरी खुर्दमध्ये भक्तीचा जागर! 🌺
मंत्री ना.श्री.संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत जन्माष्टमीचा धार्मिक सोहळा उत्साहात

🙏 बंजारा समाजाचे श्रद्धास्थान आणि धार्मिक आस्थेचे केंद्र असलेल्या उमरी खुर्द येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.

🌼 मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज, ५ सप्टेंबर रोजी उमरी खुर्द येथे उपस्थित राहून संत जेतालाल महाराज, सामकी माता तसेच देवी-देवतांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी समाज बांधवांशी संवाद साधून धार्मिक सोहळ्यात सहभाग नोंदविला.

🪔 उमरी खुर्द येथील संत जेतालाल महाराज मंदिर संस्थानात गोकुळाष्टमीनिमित्त दरवर्षी श्रावण महिन्यात भजन संध्येसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वावर भगवान श्रीकृष्णाच्या चरणी सुख, समृद्धी आणि नवचैतन्य नांदावे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

🌿 यावर्षी धर्मगुरू यशवंत महाराज यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर गोपाळकाला आणि दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. प्रमुख मार्गावरून मिरवणूकही काढण्यात आली.

🙏 धार्मिक सोहळ्यात मंत्री संजय राठोड तसेच खासदार संजय देशमुख यांनी देवी-देवतांचे दर्शन घेतले. मंदिर संस्थानच्या वतीने महंत धर्मगुरू यशवंत महाराज आणि महंत अभिमान महाराज यांनी मंत्री श्री राठोड व खासदार श्री देशमुख यांचा शाल व फेटा बांधून सन्मान केला.

🕉️ धर्मगुरू यशवंत महाराज यांच्या अरदासने आणि भोग-भंडाऱ्याने या धार्मिक सोहळ्याची सांगता झाली. परिसरातील हजारो भाविक आणि समाज बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत भोग-भंडारा व महाप्रसादाचा लाभ घेतला.

✨ श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकोप्याने भारलेले उमरी खुर्दचे वातावरण या सोहळ्यामुळे अधिकच मंगलमय झाले. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने उमरी खुर्दमध्ये भक्तीचा जागर आणि धार्मिक परंपरेचा उत्साह अनुभवायला मिळाला.

#उमरीखुर्द #श्रीकृष्णजन्माष्टमी #गोकुळाष्टमी #संतजेतालालमहाराज #सामकीमाता #संजयराठोड #यशवंतमहाराज #भोगभंडारा #महाप्रसाद #बंजारा_समाज #वाशिम

📚 जवाहर नवोदय विद्यालयाच्या नववी व अकरावी प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू!⏰ ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येण...
05/09/2026

📚 जवाहर नवोदय विद्यालयाच्या नववी व अकरावी प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू!

⏰ ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार

वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची शैक्षणिक संधी! केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड, नवी दिल्ली अंतर्गत संचालित पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, वाशिम येथे शैक्षणिक सत्र २०२७-२८ साठी इयत्ता नववी व अकरावीच्या प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

पात्र विद्यार्थ्यांनी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत.

📝 इयत्ता नववीसाठी पात्रता

शैक्षणिक सत्र २०२६-२७ मध्ये मान्यताप्राप्त सरकारी, निमशासकीय किंवा खासगी शाळेत इयत्ता आठवीत शिकणारे विद्यार्थी नववीच्या प्रवेशासाठी अर्ज करू शकतात.

➡️ विद्यार्थी वाशिम जिल्ह्याचा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे.

📖 इयत्ता अकरावीसाठी पात्रता

शैक्षणिक सत्र २०२६-२७ मध्ये मान्यताप्राप्त सरकारी, निमशासकीय किंवा खासगी शाळेत इयत्ता दहावीत शिकणारे विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज करू शकतात.

➡️ यासाठीही विद्यार्थी वाशिम जिल्ह्याचा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे.

📅 महत्त्वाच्या तारखा

🔹 ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख : ३० सप्टेंबर २०२६
🔹 निवड चाचणी परीक्षा : १० एप्रिल २०२७

💻 अर्ज पूर्णपणे विनामूल्य

प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज पूर्णपणे विनामूल्य आहे. पात्र विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज भरावा.

🔸 इयत्ता नववीसाठी अर्ज :
cbseitms.nic.in/2026/nvsix_9

🔸 इयत्ता अकरावीसाठी अर्ज :
cbseitms.nic.in/2026/nvsxi_11

🔸 प्रवेश प्रक्रिया व परीक्षेसंबंधी सविस्तर माहिती :
navodaya.gov.in

🎯 पालक व विद्यार्थ्यांनी अर्जाची अंतिम तारीख लक्षात घेऊन आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज वेळेत पूर्ण करावा.

वाशिम जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊन या शैक्षणिक संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालय, वाशिमच्या प्राचार्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

#जवाहरनवोदयविद्यालय #नवोदयप्रवेश #प्रवेशप्रक्रिया #इयत्तानववी #इयत्ताअकरावी #निवडचाचणी #शैक्षणिकसंधी #वाशिम

05/09/2026

🌾 शेतकरी बांधवांनो..! खतासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही!

📲 २५ ऑगस्ट २०२६ पासून जिल्ह्यात एफएफएस पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू

📱 खत विक्रीसाठी एफएफएस या केंद्र पुरस्कृत ॲपद्वारे घरबसल्या खतसाठ्याची माहिती मिळवा आणि अनुदानित खताचे बुकिंग करा.

“उपलब्ध खतसाठ्याची माहिती शेतकऱ्यांना घरबसल्या मिळावी आणि गरजेपुरते अनुदानित खत पारदर्शकपणे उपलब्ध व्हावे, हा एफएफएस पथदर्शी प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ॲग्री स्टॅकचा शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार केलेला नाही, त्यांनी तो लवकरात लवकर तयार करून घ्यावा आणि या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.”

— योगेश कुंभेजकर, जिल्हाधिकारी, वाशिम यांचे आवाहन

#एफएफएस #खतबुकिंग #शेतकरी #फार्मरआयडी #अनुदानितखत #कृषी #वाशिम

महाराष्ट्रात मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंमलात आल्यापासून आणि २०११ व २०१४ मधील सुधारित कायद्यांनुसार राज्यात अवयवदानाच...
04/09/2026

महाराष्ट्रात मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंमलात आल्यापासून आणि २०११ व २०१४ मधील सुधारित कायद्यांनुसार राज्यात अवयवदानाचा आलेख सातत्याने उंचावत असून हजारो रुग्णांना नवजीवन मिळाले आहे. राज्य शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग, प्रादेशिक अवयव व उती प्रत्यारोपण समन्वय संस्था तसेच मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्रांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे राज्यभरात अवयवदानाबाबत मोठी सकारात्मकता दिसून येत आहे. यामुळे राज्यभर व्यापक अवयवदान प्रबोधन मोहीम राबविण्याचे आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.

राज्यात १९९५ पासून ऑक्टोबर २०२६ पर्यंत झालेल्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियांची आकडेवारी पाहिल्यास या क्षेत्रात मोठे यश मिळाल्याचे दिसून येते. या कालावधीत एकूण १७,३२५ जिवंत व्यक्तींमधील अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडल्या असून त्यामध्ये १४,९४९ मूत्रपिंड (किडनी) आणि २,३७६ यकृत (लिव्हर) प्रत्यारोपणांचा समावेश आहे. तसेच मरणोत्तर अवयवदानातून एकूण ३,३७३ गरजू रुग्णांना नवीन आयुष्य मिळाले आहे. यामध्ये १८५३ मूत्रपिंड, ९८७ यकृत, २२० हृदय, ६३ फुफ्फुस आणि नेत्र व उतींसह २५० इतर अवयवांच्या यशस्वी रोपणाचा समावेश आहे. सध्या राज्यात विविध अवयवांसाठी प्रतीक्षारत असलेल्या रुग्णांमध्ये मूत्रपिंडासाठी ४०७५, यकृतासाठी ८८८, हृदयासाठी ६३, फुफ्फुसासाठी २४, स्वादुपिंडासाठी १५, हातासाठी ११ आणि लहान आतड्यासाठी ८ रुग्ण प्रतीक्षेत आहेत, ज्यांच्यासाठी अवयवदानाचे आवाहन सातत्याने केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

शासकीय पातळीवर अवयवदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी पथनाट्ये, चित्रपटगृहांमधील जाहिराती, आकाशवाणीवरील संदेश, परिसंवाद आणि लघुपट प्रदर्शनाद्वारे 'महाअवयवदान महोत्सव' यशस्वीरीत्या राबविण्यात आला. या सर्वसमावेशक प्रयत्नांमुळे राज्यातील अवयवदानाविषयीच्या अंधश्रद्धा दूर होऊन एका नव्या सामाजिक क्रांतीची सुरुवात झाल्याची माहितीही मंत्री आबिटकर यांनी दिली.

📍 जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचे ‘अहिल्याभवन’मध्ये स्थलांतरनवीन कार्यालयाच्या पत्त्याची नागरिकांनी नोंद घ्य...
04/09/2026

📍 जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचे ‘अहिल्याभवन’मध्ये स्थलांतर

नवीन कार्यालयाच्या पत्त्याची नागरिकांनी नोंद घ्यावी

वाशिम, दि. ४ सप्टेंबर : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचे जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, कक्ष क्रमांक २०४ येथून सिव्हिल लाईन ते काटा चौफुली रोडवरील ‘अहिल्याभवन’ इमारतीमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे.

महिला व बालविकास विभागाशी संबंधित कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांनी यापुढे नवीन कार्यालयाच्या पत्त्याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी उत्तम शिंदे यांनी केले आहे.

📌 नवीन कार्यालयाचा पत्ता :
अहिल्याभवन/महिला व बालविकास भवन,
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) कार्यालयाच्या पाठीमागे,
सिव्हिल लाईन ते काटा चौफुली रोड, वाशिम.

➡️ नागरिकांनी महिला व बालविकास विभागाशी संबंधित कामासाठी नवीन कार्यालयातच संपर्क साधावा.

#वाशिम #महिलावबालविकास #अहिल्याभवन #महिलासक्षमीकरण #बालविकास #नवीनकार्यालय #नागरिकांसाठीमाहिती

'विकसित महाराष्ट्र २०४७' या ध्येयाकडे वाटचाल करताना समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होणे आवश्यक असून ' #दिशा' अभियानाच्या...
04/09/2026

'विकसित महाराष्ट्र २०४७' या ध्येयाकडे वाटचाल करताना समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होणे आवश्यक असून ' #दिशा' अभियानाच्या माध्यमातून विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली जात आहे. या अभियानाशी जोडलेल्या राज्यातील सर्व विशेष शिक्षकांना त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल राज्य शासनाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विशेष मुलांना योग्य शिक्षण, संधी आणि वातावरण उपलब्ध करुन देणे ही सामूहिक जबाबदारी असून या क्षेत्रात महाराष्ट्र देशासाठी दिशादर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात विशेष शिक्षकांचा प्रातिनिधिक स्वरूपात राज्यस्तरीय सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास जय वकील फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना चंद्र, एसीईसीएफचे सह संस्थापक अमित चंद्र, जय वकील फाऊंडेशनच्या अध्यक्ष व संचालक डॉ. अनायता हेगडे, बजाज फिनसर्व्हच्या अध्यक्षा शेफाली बजाज, एचटी पारेख फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी झिया लालकाका तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विशेष मुलांचे मूल्यमापन केवळ गुणांवर न होता, त्यांचा आत्मविश्वास आणि समाजात समरस होण्याची क्षमता यावर होते. सर्व शाळांमध्ये 'दिशा' अभियान स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. सध्या राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये 450 हून अधिक शाळा, 2700 हून अधिक शिक्षक आणि 21 हजारांहून अधिक दिव्यांग व बौद्धिक अक्षम विद्यार्थी या अभियानाशी जोडले गेले आहेत. या मुलांना वैज्ञानिक आणि नव्या अध्यापन तंत्राच्या आधारे शिक्षण देण्यासाठी लागणारी साधनसामग्री या उपक्रमामुळे उपलब्ध झाली आहे.


#शिक्षकदिन
#विकसितमहाराष्ट्र२०४७

04/09/2026

बेरोजगार तरुण-तरुणींना थेट नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर यांच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी ‘रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ चे आयोजन केले आहे. याअंतर्गत दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्ह्यातील १० ठिकाणी हे रोजगार मेळावे पार पडणार आहेत. मुंबईतील अधिकाधिक उमेदवारांनी या कार्यक्रमासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन सहायक आयुक्त सुनिल पवार, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांनी केले आहे.
यासंदर्भाती सविस्तर वृत्त - https://mahasamvad.in/213817/
#रोजगारमेळावा
#रोजगार
#महाराष्ट्रशासन

महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर या उपक्रमाचा विस्तार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर...
04/09/2026

महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर या उपक्रमाचा विस्तार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर होत आहे. २०२६ च्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशातील तसेच परदेशातील सामाजिक व विधायक उपक्रमांद्वारे गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक मंडळांनाही या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अर्जासाठी https://ganeshotsav.pldmka.co.in या संकेतस्थळाचा वापर करावा. इच्छुक मंडळांनी विहित नमुन्यातील माहिती व आवश्यक कागदपत्रे सादर करून या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

#गणेशोत्सव२०२६
#राज्यमहोत्सव
#पुरस्कार

महाविस्तार – एआय … शेतकऱ्यांचा डिजिटल साथी!शेतीसाठी आवश्यक माहिती एका फोनवर! #महाविस्तारएआय    #शेतकरी  #महाराष्ट्रशासन ...
04/09/2026

महाविस्तार – एआय … शेतकऱ्यांचा डिजिटल साथी!

शेतीसाठी आवश्यक माहिती एका फोनवर!

#महाविस्तारएआय #शेतकरी #महाराष्ट्रशासन

Address

District Information Office
Washim
444505

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जिल्हा माहिती कार्यालय, वाशिम posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to जिल्हा माहिती कार्यालय, वाशिम:

Shortcuts

Share