ERO 78 Yavatmal

Directions

ERO 78 Yavatmal Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ERO 78 Yavatmal, Government Organization, Yavatmal.

09/07/2026
📢 विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) – २०२६मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी विशेष मोहीम🗳️ विशेष सखोल पु...
01/07/2026

📢 विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) – २०२६

मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी विशेष मोहीम

🗳️ विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) म्हणजे काय?

भारतीय निवडणूक आयोगामार्फत मतदार यादीतील प्रत्येक नोंदीची सखोल पडताळणी करून पात्र प्रत्येक नागरिकाचा समावेश आणि अपात्र व्यक्तींची वगळणी करण्यासाठी राबविण्यात येणारी विशेष मोहीम म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) होय.

या मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) प्रत्येक मतदाराच्या घरी भेट देऊन मतदारांची माहिती पडताळतात व आवश्यक असल्यास गणना फॉर्म भरून घेतात.

या मोहिमेचा उद्देश

✅ पात्र प्रत्येक नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट करणे.
✅ मतदार यादीतील माहिती अद्ययावत व अचूक ठेवणे.
✅ मृत, स्थलांतरित किंवा अपात्र मतदारांच्या नोंदी वगळणे.
✅ मुक्त, निष्पक्ष व पारदर्शक निवडणुकांसाठी विश्वसनीय मतदार यादी तयार करणे.

मतदारांनी काय करावे?

🔹 BLO आपल्या घरी आल्यावर आवश्यक माहिती व सहकार्य द्यावे.
🔹 गणना फॉर्म काळजीपूर्वक भरून त्यावर स्वाक्षरी करावी.
🔹 आवश्यक कागदपत्रे (जन्मतारीख, रहिवास, ओळख इ.) उपलब्ध करून द्यावीत.
🔹 भरलेल्या फॉर्मची एक प्रत स्वतःजवळ ठेवावी.

📱 आपले नाव, तपशील किंवा अर्जाची स्थिती तपासण्यासाठी
➡️ ECINET App किंवा https://voters.eci.gov.in या संकेतस्थळाचा वापर करा.

आपले एक पाऊल – सक्षम लोकशाहीकडे!

"कोणताही पात्र मतदार वंचित राहणार नाही आणि कोणतीही अपात्र व्यक्ती समाविष्ट होणार नाही."

01/07/2026

🗳️ विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) – २०२६
७८ यवतमाळ विधानसभा मतदारसंघ

आज दिनांक ०१-०७-२०२६ रोजी मा. श्री. गोपाळ देशपांडे, उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, ७८ यवतमाळ विधानसभा मतदारसंघ यांनी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत प्रत्यक्ष क्षेत्रभेट देऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यासमवेत मतदारांच्या घरोघरी जाऊन EF अर्जांचे वाटप केले तसेच सुरू असलेल्या कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

या भेटीदरम्यान मतदारांना EF अर्ज अचूकपणे भरून आवश्यक कागदपत्रांसह वेळेत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच BLO यांना घरभेटीदरम्यान प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचून कोणताही पात्र मतदार वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक मतदार यादी तयार करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. नागरिकांनीही या विशेष मोहिमेस सक्रिय सहकार्य करावे.

🗳️ अचूक मतदार यादी – सशक्त लोकशाहीचा मजबूत पाया!

#विशेष_सखोल_पुनरीक्षण #मतदार_जागरूकता

🗳️ विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) – २०२६७८ यवतमाळ विधानसभा मतदारसंघआज दिनांक ०१-०७-२०२६ रोजी मा. श्री. गोपाळ देशपांडे, उपविभ...
01/07/2026

🗳️ विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) – २०२६
७८ यवतमाळ विधानसभा मतदारसंघ

आज दिनांक ०१-०७-२०२६ रोजी मा. श्री. गोपाळ देशपांडे, उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, ७८ यवतमाळ विधानसभा मतदारसंघ यांनी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत प्रत्यक्ष क्षेत्रभेट देऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यासमवेत मतदारांच्या घरोघरी जाऊन EF अर्जांचे वाटप केले तसेच सुरू असलेल्या कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

या भेटीदरम्यान मतदारांना EF अर्ज अचूकपणे भरून आवश्यक कागदपत्रांसह वेळेत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच BLO यांना घरभेटीदरम्यान प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचून कोणताही पात्र मतदार वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक मतदार यादी तयार करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. नागरिकांनीही या विशेष मोहिमेस सक्रिय सहकार्य करावे.

🗳️ अचूक मतदार यादी – सशक्त लोकशाहीचा मजबूत पाया!

#विशेष_सखोल_पुनरीक्षण #मतदार_जागरूकता

📢 विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) – २०२६मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी विशेष मोहीम🗳️ विशेष सखोल पु...
01/07/2026

📢 विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) – २०२६
मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी विशेष मोहीम

🗳️ विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) म्हणजे काय?
मतदार यादीतील प्रत्येक नोंदीची पडताळणी करून पात्र मतदारांचा समावेश करणे, अपात्र नोंदी व त्रुटी दूर करणे आणि मतदार यादी अद्ययावत व अचूक ठेवण्याची ही विशेष प्रक्रिया आहे.

SIR चे प्रमुख टप्पे

✅ १. घरभेट व पडताळणी (Enumeration Phase)
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी भेट देऊन मतदारांची माहिती व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करतील.

📝 २. प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी (Draft Roll Publication)
पडताळणीनंतर तयार झालेली प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

📄 ३. दावे व हरकती (Claims & Objections)
नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती, वगळणे किंवा इतर बदलांसाठी नागरिकांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध असेल.

📋 ४. अंतिम मतदार यादी प्रसिद्धी (Final Roll Publication)
दावे व हरकतींची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

⚖️ ५. अपील कालावधी (Appeal Period)
निर्णयाबाबत असमाधान असल्यास नियमानुसार अपील करता येईल.

📢 नागरिकांना आवाहन

✔️ BLO आपल्या घरी आल्यास आवश्यक माहिती व कागदपत्रे सहकार्याने उपलब्ध करून द्या.
✔️ मतदार यादीतील आपली माहिती तपासा.
✔️ पात्र प्रत्येक नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी सहकार्य करा.

🗳️ अचूक मतदार यादी – सशक्त लोकशाहीची पायाभरणी!
#विशेष_सखोल_पुनरीक्षण #मतदारयादी #मतदार_जागरूकता

🏠🗳️ विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) 2026 🗳️🏠📢 सर्व नागरिकांना आवाहनभारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. ३० जून २०२६ ...
25/06/2026

🏠🗳️ विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) 2026 🗳️🏠

📢 सर्व नागरिकांना आवाहन

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. ३० जून २०२६ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) आपल्या घरी भेट देणार आहेत.

👨‍💼🚶‍♀️ BLO आपल्या घरी येऊन गणना फॉर्म (EF Form) वितरित करतील.

📋 कृपया BLO यांना सहकार्य करा व खालील कागदपत्रे तयार ठेवा :
✅ ओळखीचा पुरावा
✅ जन्मतारखेचा पुरावा
✅ रहिवासाचा पुरावा (लागू असल्यास)

📝 प्राप्त EF फॉर्म अचूक माहिती भरून BLO यांच्याकडे वेळेत जमा करा.

🎯 आपले नाव मतदार यादीत अचूक व अद्ययावत ठेवणे ही प्रत्येक जबाबदार नागरिकाची जबाबदारी आहे.

🤝 BLO आपल्या सेवेसाठी येत आहेत, कृपया त्यांना पूर्ण सहकार्य करा.

🇮🇳 "सशक्त मतदार यादी – सशक्त लोकशाही" 🇮🇳

#मतदारयादी #लोकशाही 🗳️

Address

Yavatmal
445001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ERO 78 Yavatmal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share