DM, Yavatmal

DM, Yavatmal Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from DM, Yavatmal, Government Organization, Collector Office, LIC Square, Bangar Nagar, Yavatmal.

महात्मा ज्योतिबा फुले नाट्यगृहाच्या प्रलंबित कामांचा पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी विकास मीना...
11/08/2026

महात्मा ज्योतिबा फुले नाट्यगृहाच्या प्रलंबित कामांचा पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला. नाट्यगृह नागरिकांसाठी लवकर खुले करण्याच्या दृष्टीने उर्वरित कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

विशेष मतदार यादी पुनरीक्षण (SIR) २०२६ साठी महाराष्ट्रातील सुधारित वेळापत्रक जाहीर!भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार S...
11/08/2026

विशेष मतदार यादी पुनरीक्षण (SIR) २०२६ साठी महाराष्ट्रातील सुधारित वेळापत्रक जाहीर!
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार SIR प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत आहे का, याची खात्री करून आवश्यक असल्यास विहित मुदतीत दावा किंवा हरकत नोंदवावी.
महत्त्वाच्या तारखा : • घरघर पडताळणी : १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत
• मतदार यादी पुनर्गठन : १७ ऑगस्ट
• मसुदा मतदार यादी : २४ ऑगस्ट
• दावे व हरकती : २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर
• अंतिम मतदार यादी : २७ ऑक्टोबर २०२६
आपल्या मतदानाच्या हक्कासाठी मतदार यादीतील नोंदणी अवश्य तपासा.

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी परदेशात अभ्यास दौऱ्याची सुवर्णसंधी!आधुनिक शेती तंत्रज्ञान, परदेशातील शास्त्रज्ञ व शेतकऱ...
11/08/2026

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी परदेशात अभ्यास दौऱ्याची सुवर्णसंधी!
आधुनिक शेती तंत्रज्ञान, परदेशातील शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद आणि क्षेत्रीय भेटींचा लाभ घेण्याची संधी.
शासनाकडून ९०% पर्यंत अनुदान, कमाल ₹२ लाखांपर्यंत अनुदान.
अर्जाची अंतिम मुदत : १४ ऑगस्ट २०२६
प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत : १९ ऑगस्ट २०२६
इच्छुक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपला परिपूर्ण प्रस्ताव संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात १४ ऑगस्टपूर्वी सादर करावा.

07/08/2026

खाद्यपदार्थ खरेदी करताना जागरूक राहा!
पॅकेज्ड अन्नपदार्थांवरील लेबल, उत्पादनाची माहिती, वैधता दिनांक आणि इतर आवश्यक तपशील तपासूनच खरेदी करा. सुरक्षित अन्न ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा आणि आरोग्याची काळजी घ्या.

बालमजुरीमुक्त यवतमाळसाठी विशेष मोहीम!बालकामगार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शहर व ग्रामीण भ...
06/08/2026

बालमजुरीमुक्त यवतमाळसाठी विशेष मोहीम!
बालकामगार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शहर व ग्रामीण भागातील वीटभट्ट्या, हॉटेल्स आणि इतर आस्थापनांची विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. बालमजुरी आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
बालकांचे शिक्षण, संरक्षण आणि सुरक्षित भविष्य हीच आपली सामूहिक जबाबदारी.

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
01/08/2026

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

महसूल दिननिमित्त महसूल विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा !
01/08/2026

महसूल दिन
निमित्त महसूल विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा !

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
01/08/2026

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट! भारतीय हवामान विभागाच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षि...
30/07/2026

जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट!

भारतीय हवामान विभागाच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शुक्रवार, ३१ जुलै २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

⚠️ पूर्वनियोजित परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार सुरू राहतील.

नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, पूरप्रवण भागांपासून दूर राहावे आणि केवळ प्रशासन व भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा.

Address

Collector Office, LIC Square, Bangar Nagar
Yavatmal
445001

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when DM, Yavatmal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share