एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल, जि. जळगाव

  • Home
  • India
  • Yawal
  • एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल, जि. जळगाव

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल, जि. जळगाव आदिवासी जनहिताय

         #पारदर्शकप्रशासन  #यावल  #आदिवासीविकासविभाग
10/07/2026

#पारदर्शकप्रशासन #यावल #आदिवासीविकासविभाग

नाशिक विभागीय आयुक्तांनी घेतला शासकीय आश्रमशाळेचा आढावा; डिजिटल उपक्रमांचे कौतुकलालमाती: नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त ड...
03/07/2026

नाशिक विभागीय आयुक्तांनी घेतला शासकीय आश्रमशाळेचा आढावा; डिजिटल उपक्रमांचे कौतुक
लालमाती: नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. श्री. प्रवीण गेडाम साहेब यांनी नुकताच लालमाती येथील शासकीय आश्रमशाळेला सदिच्छा भेट दिली. या दौऱ्यात जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे साहेब आणि जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती कश्मीरा नायर मॅडम प्रामुख्याने उपस्थित होत्या.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शासकीय आश्रमशाळेच्या शैक्षणिक व विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. विशेषतः, शाळेतील डिजिटल क्लासरूम, सुसज्ज अभ्यासिका आणि वर्गखोल्यांच्या नियोजनाची त्यांनी पाहणी केली. आधुनिक शिक्षण प्रणालीचा आश्रमशाळेत होत असलेला वापर पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, शासकीय वस्तीगृहाची पाहणी करून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या सोयीसुविधांची प्रत्यक्ष पडताळणी केली.
शाळेतील बहुउद्देशीय हॉलमध्ये या परिसरातील सहस्त्रलिंग, लालमाती व आसपासच्या गावांतील आदिवासी बांधवांसाठी एका विशेष संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आदिवासी बांधवांच्या समस्या व अडीअडचणी जाणून घेऊन, त्या तातडीने सोडवण्याबाबत शासन कटिबद्ध असल्याचे आश्वासन विभागीय आयुक्तांनी दिले.
याप्रसंगी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी श्री. अरुण पवार साहेब, सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. प्रवीण दाभाडे श्री. जावेद तडवी, श्री. संदीप पाटील, श्री. पवन पाटील, शाळेचे मुख्याध्यापक श्री. मनेश तडवी तसेच शाळेतील इतर कर्मचारी उपस्थित होते. प्रकल्प अधिकारी श्री. अरुण पवार यांनी आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा व शाळेच्या प्रगतीचा अहवाल सादर केला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी आणि शाळेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या नियोजनाबद्दल आणि मेहनतीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले. आश्रमशाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आदिवासी बांधवांच्या समस्या निवारणासाठी हा दौरा अत्यंत फलदायी ठरला.

10/06/2026

30/05/2026
*🏹सन्मान संस्कृतीचा/ सन्मान समाजाचा**🏹🏹बहुरंग पुणे आयोजित 19 वा आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सव 2026 पुणे येथे आदि...
11/05/2026

*🏹सन्मान संस्कृतीचा/ सन्मान समाजाचा*

*🏹🏹बहुरंग पुणे आयोजित 19 वा आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सव 2026 पुणे येथे आदिवासीची होळी या संस्कृती संवर्धनपटाला उत्कृष्ठ माहितीपट सन्मान जाहीर.🏹🏹.*

देश विदेशातील आदिवासी बांधवांच्या संस्कृती, रूढी, परंपरा, वैशिष्टे याचे दर्शन जगाला व्हावे यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर आदिवासी चित्रपट महोत्सव याचे आयोजन केले जाते.. यातून विविध भागातील आदिवासी बांधव आपापल्या आदिवासी संस्कृतीवर आधारित वेगवेगळी लघुपटे सादर करून उपस्थित प्रेक्षकांना आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवीत असतात..
यात आपल्या जिल्ह्यातील आदिवासींची होळी हा माहितीपट सादर करण्यात आला. या महितीपटाला उत्कृष्ठ संस्कृती संवर्धनपट पुरस्कार जाहीर झाला आहे.
हा माहितीपट तयार करण्यासाठी मा. प्रकल्प अधिकारी अरुण पवार साहेब, दिग्दर्शक मुबारक तडवी, मुराद तडवी, मजीत तडवी आणि स्थानिक आदिवासी बांधवांचा सहभाग आहे. हा सन्मान फक्त टीम चा नसून संपूर्ण समाजाला आहे.. आज रोजी TRTI पुणे चे आयुक्त माननीय मंजिरी मनोलकर मॅडम, दृश्यंम चित्रपटाचे कलाकार सोमण सर, दूरदर्शन चे संचालक बागल साहेब सहाय्यक प्रकल्प अधिकारी माहुरे साहेब व बहुरंग पुणे चे अध्यक्ष कुंडलिक केदारी साहेब यांच्या उपस्थितीत पुणे येथे सन्मान करण्यात आला..

1 like. "आदिवासींची होळी"

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल - यशोगाथा! 🚩प्रकल्प कार्यालयांतर्गत मेहुणबारे आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याची गरुडझेप:...
16/04/2026

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल - यशोगाथा! 🚩

प्रकल्प कार्यालयांतर्गत मेहुणबारे आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याची गरुडझेप: समाधान जाधवची 'मुंबई लोहमार्ग पोलीस' पदी निवड! 👮‍♂️
**जळगाव/यावल:** आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि क्रीडा सुविधा पुरवल्या जातात, याचे एक आदर्श उदाहरण आज समोर आले आहे. **एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल** अंतर्गत असलेल्या **मेहुणबारे येथील शासकीय अनुदानित आश्रमशाळेचा** माजी विद्यार्थी आणि नामवंत खेळाडू **समाधान दौलत जाधव** याची **'मुंबई लोहमार्ग पोलीस'** दलात निवड झाली आहे.
# # # **🏅 क्रीडा मैदानावरील चमक आता पोलीस दलात!**
समाधानने आपले इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतचे शिक्षण मेहुणबारे आश्रमशाळेत पूर्ण केले. आदिवासी विकास विभाग आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत त्याने आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला होता:
* **भालाफेक:** सलग दोन वर्षे प्रथम क्रमांक.
* **थाळीफेक:** सलग दोन वर्षे प्रथम क्रमांक.
क्रीडा क्षेत्रातील हीच शिस्त आणि जिद्द त्याला पोलीस भरतीच्या प्रशिक्षणात कामी आली. मागील दीड वर्षांपासून त्याने घेतलेल्या अथक परिश्रमाचे फळ आज त्याला खाकी वर्दीच्या रूपात मिळाले आहे.
# # # **🤝 प्रकल्प कार्यालयाचा सार्थ अभिमान**
प्रकल्प कार्यालयाच्या वतीने या यशाचे स्वागत करण्यात आले आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिल्यास ते प्रशासकीय आणि संरक्षण दलात उच्च पदे भूषवू शकतात, हे समाधानने दाखवून दिले आहे. समाधान हा केवळ त्याच्या कुटुंबाचाच नाही, तर यावल प्रकल्प कार्यालयाचा आणि मेहुणबारे शाळेचा अभिमान आहे.
# # # **💐 हार्दिक अभिनंदन!**
समाधान दौलत जाधव याच्यासह त्याच्या मार्गदर्शक शिक्षकांचे, मुख्याध्यापकांचे आणि त्याच्या माता-पित्यांचे **प्रकल्प कार्यालय, यावल** परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन!
पुढील वाटचालीस आणि देशसेवेस खूप खूप शुभेच्छा! 🌹🌹🌹🌹

Address

PWD Campus, Chopda Road
Yawal
425301

Opening Hours

Monday 10am - 6:15pm
Tuesday 10am - 6:15pm
Wednesday 10am - 6:15pm
Thursday 10am - 6:15pm
Friday 10am - 6:15pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल, जि. जळगाव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share