Shoumika Amal Mahadik

Shoumika Amal Mahadik Vice President, BJP Mahila Morcha Maharashtra
Director, Gokul Milk Kolhapur
Ex-President, ZP Kolhapur
(1)

सामाजिक कार्य करण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं. ते मन निसर्गतःच आम्हा स्त्रियांना लाभलेलं आहे. मात्र आजवर चौकटीच्या आत बंदिस्त करून ठेवल्या गेलेल्या व सामाजिक क्षेत्रात स्वयंभू व्हायला संधी नाकारलेल्या स्त्रियांना याच चौकटीला धडका देवून आपल्यासह समाजाच्या प्रगतीची दारे किलकिली करण्याचे सामर्थ्य निर्माण व्हावे, यासाठी मी प्रयत्नशील आहे. कारण स्त्रियांना संधी मिळाली तर त्या त्याचे सोने करून त्याच

ा उपयोग इतरांच्या फायद्यासाठी करतात. हे आजवर आपण पाहिले आहे. महाराणी ताराबाईंचा इतिहास लाभलेल्या या माझ्या कोल्हापूर जिल्ह्याने स्त्रियांच्या सक्षमीकरणातून समाजहित साधण्याचा जो आदर्श घालून दिला आहे, त्याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत.

आजही समाजाकडे पाहत असताना कितीतरी उणिवा असल्याच्या जाणवतात. हाच समाज अधिक सक्षम, सजग, समृद्ध आणि स्वयंपुर्ण व्हावा, यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेची अध्यक्षा म्हणून कार्यरत असताना संपुर्ण जिल्ह्यात विकासाचा नवा पॅटर्न राबविण्यासाठी मी वेगवेगळे प्रयोग केले. याहीपुढे लोकप्रतिनिधी म्हणून सर्व घटकांना सोबत घेऊन त्यांच्या विकासासाठी अविरत प्रयत्न करणे, हाच माझा उद्देश आहे.

अनेक महिला सध्या चार भिंतींचा उंबरठा ओलांडून "आत्मनिर्भर' बनण्यासाठी बाहेर पडल्या आहेत. काही जणी नोकरी करतात तर काहीजणी स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भरतेकडे पाऊले टाकताहेत. त्यांना आर्थिक, मानसिक, शारिरीकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांच्या पाठिशी मी नेहमी उभी राहीन. त्यासोबतच अजूनही ज्या महिलांना "आत्मनिर्भरते'कडे वाटचाल करायची आहे, त्यांच्यासाठीही विविध उपक्रम राबविण्याचा मानस आहे.

महिलांना स्वतःची ओळख निर्माण करता यावी व त्यासाठी विविध संधी देण्यासाठी, त्यांच्या अडीअडचणी समजावून घेण्यासाठी, त्यावर शासनस्तरावर उपाययोजना करण्यासाठी हवे ते प्रयत्न करण्याची माझी तयारी आहे.

युवती, मुलीही सध्या शिक्षणासोबत स्वतःची ओळख करून घेण्यासाठी जग धुंडाळत आहेत. त्यांनाही समाजातील काही अनिष्ट प्रवृत्तींकडून त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय. हे थांबविण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे. त्यांना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या ऐकून घेण्यासाठी माझे दरवाजे नेहमी खुले असतील.

येणाऱ्या काळातील कोल्हापूरचा सर्वांगीण विकास व्हावा, मुलभुत सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, पायाभूत सुविधांना प्राधान्य मिळावे, यासाठी मी नेहमीच तत्पर आहे. हे ध्येय पूर्ण करण्यात आपल्या सर्वांचीच साथ माझ्यासाठी मोलाची आहे.

जागतिक सायकल दिन आरोग्याला पूरक, स्वस्त आणि पर्यावरणाला अनुकूल असा पर्याय सायकल! #जागतिक_सायकल_दिन
03/06/2026

जागतिक सायकल दिन

आरोग्याला पूरक, स्वस्त आणि
पर्यावरणाला अनुकूल असा पर्याय सायकल!

#जागतिक_सायकल_दिन

कुशल संघटक, माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथजी मुंडे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! #गोपीनाथ_मुंडे
03/06/2026

कुशल संघटक, माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथजी मुंडे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#गोपीनाथ_मुंडे

भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार श्री. सुरेशजी हाळवणकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!Suresh Halwankar
02/06/2026

भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार श्री. सुरेशजी हाळवणकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Suresh Halwankar

हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. अशोकराव माने यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
01/06/2026

हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार
श्री. अशोकराव माने यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाला उपस्थित राहिले. दोन दिवस चाललेल्या या ...
01/06/2026

भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाला उपस्थित राहिले. दोन दिवस चाललेल्या या प्रशिक्षण कार्यशाळेत अनेक मान्यवर वक्त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रमोद जठार, मकरंद देशपांडे, समरजीतसिंहराजे घाटगे, संजयबाबा घाटगे, राजवर्धन नाईक निंबाळकर, नाथाजी पाटील यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. सुरेश खाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!Suresh Khade
01/06/2026

मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. सुरेश खाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Suresh Khade

जागतिक दुध दिन सर्व दूध उत्पादकांना जागतिक दुध दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #जागतिक_दुध_दिन
01/06/2026

जागतिक दुध दिन

सर्व दूध उत्पादकांना जागतिक दुध दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#जागतिक_दुध_दिन

गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी भाजप सज्ज! गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता...
31/05/2026

गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी भाजप सज्ज!

गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. य

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वपूर्ण सुचना दिल्या तसेच प्रमुख नेते व कार्यकर्त्यांनी एक दिलाने एकत्र यावे आणि गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी आत्तापासूनच जोमाने कामाला लागावे,असे आवाहन केले.

गोकुळ'मध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी महायुती कटिबद्ध आहे. असा विश्वास यावेळी दिला.

याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक,माजी मंत्री मा. प्रकाश आवाडे, माजी मंत्री मा. सुरेश हळवणकर, आमदार मा. राहुल आवाडे, मा. संजयबाबा घाटगे, मा. समरजितसिंह घाटगे यांच्यासह जिल्ह्यातील भाजप व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra BJP Kolhapur
Devendra Fadnavis Chandrakant Patil MLA Prakash Awade -प्रकाश आवाडे Suresh Halwankar Shoumika Amal Mahadik

31/05/2026
न्यायनिष्ठ, थोर पराक्रमी व कुशल प्रशासक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #अहिल्यादेवी_होळ...
31/05/2026

न्यायनिष्ठ, थोर पराक्रमी व कुशल प्रशासक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#अहिल्यादेवी_होळकर

Address

Kolhapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shoumika Amal Mahadik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shoumika Amal Mahadik:

Share