16/06/2026
सोलापूर येथे महिलांनी आयोजित केलेल्या परिषदेसाठी गेले असता सोलापूर लिनेस क्लब अध्यक्ष नंदाताई लाहोटी आणि त्यांच्या टीमने भव्य स्वागत केले माझे रांगोळीतून चित्र रेखाटलेले पाहून मन भारावून गेले, सोलापूर येथे महिलांनी होतकरू आणि गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप आणि स्लम एरियातील स्कूल साठी शालेय साहित्य देऊन सामाजिक कार्यात खूप मोठे योगदान दिलं यामध्ये सोलापूर लिनेस क्लब अध्यक्ष नंदाताई लाहोटी आणि पदाधिकारी रेखाताई लाहोटी आणि त्यांची टीम यांनी उत्कृष्ट कामगिरी करून लिनेस क्लबचे सामाजिक कार्य समाजासमोर आदर्श ठेवून आणि सामाजिक कार्य करण्यासाठी समाजाला प्रेरित करून नंदाताई लाहोटी आणि पदाधिकारी रेखाताई लाहोटी आणि त्यांची टीम यांचे कर्तृत्व कायम माझ्या आठवणीत राहील🙏
प्रा जयश्री भास्कर गटकुळ, इंदापूर