19/09/2026
प्रति,
मा. लोकसेवक तथा संबंधित सक्षम प्राधिकारी,
____________________________ कार्यालय,
____________________________.
विषय : नागरिकाने सादर केलेल्या अर्ज/निवेदन/तक्रारीवर विहित कालमर्यादेत कार्यवाही न करता दप्तर दिरंगाई केल्याबाबत संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांवर नियमानुसार शिस्तभंगाची कार्यवाही करण्याबाबत.
संदर्भ :
1. माझा अर्ज/निवेदन/तक्रार दि. __________
2. ग्रामविकास विभागाचे पत्र दि. 03.08.2026, क्र. न्यायाप्र-१३२६/प्र.क्र.१६३/आस्था-१४.
3. सामान्य प्रशासन विभागाचे शासन परिपत्रक दि. 11.09.2026, क्र. संकीर्ण-२०२६/प्र.क्र.४९/रवका-१.
4. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडण्यास होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, 2005 मधील कलम 10.
5. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 मधील लागू तरतुदी.
6. मा. मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, रिट याचिका क्र. 5669/2026 – श्री. प्रविण केशव रणदिवे व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर, आदेश दि. 27.07.2026.
महोदय,
वरील विषय व संदर्भीय शासन निर्देशांच्या अनुषंगाने हे निवेदन/तक्रार सादर करण्यात येत आहे की, मी ______________________________ या कार्यालयात ______________________________ या कामासंदर्भात दि. __________ रोजी अर्ज/निवेदन/तक्रार सादर केली होती. सदर अर्जाची प्रत सोबत जोडण्यात आलेली आहे.
सदर अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यावर संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्याने नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही तत्परतेने करणे अपेक्षित होते. तथापि, अर्ज सादर करूनही आजपर्यंत त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही/निर्णय/लेखी कळविण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकाच्या अर्जावर अनावश्यक विलंब झालेला आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या दि. 11.09.2026 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन व शासकीय कर्तव्ये पार पाडण्यास होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, 2005 मधील कलम 10(1) नुसार प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने त्याच्यावर सोपविलेले काम शक्य तितक्या तत्परतेने व शीघ्रतेने पार पाडणे आवश्यक आहे. सामान्यतः कोणतीही फाईल संबंधित कर्मचाऱ्याच्या टेबलावर सात कामकाजाच्या दिवसांपेक्षा अधिक काळ प्रलंबित राहू नये, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
तसेच ग्रामविकास विभागाच्या दि. 03.08.2026 रोजीच्या पत्रानुसार मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने प्राप्त निवेदने/तक्रारींची विहित कालमर्यादेत दखल घेऊन त्यावर गुणवत्तेच्या आधारे निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित प्रकरणांमध्ये विलंब अथवा निष्काळजीपणा झाल्यास जबाबदारी निश्चित करून शिस्तभंगाची कार्यवाही करण्याबाबतही स्पष्ट निर्देश आहेत.
माझ्या अर्जावर झालेला विलंब हा शासनाच्या वरील निर्देशांच्या उद्देशास बाधक असून, संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांकडून कर्तव्यपालनात कसूर, निष्काळजीपणा अथवा दप्तर दिरंगाई झाली आहे का, याची सक्षम प्राधिकाऱ्यांनी चौकशी करणे आवश्यक आहे.
ज्या अधिकारी/कर्मचाऱ्यांकडे प्रकरण प्रलंबित होते :
1. नाव : __________________________ पद : __________________
2. नाव : __________________________ पद : __________________
3. नाव : __________________________ पद : __________________
म्हणून विनंती आहे की :
1. माझ्या संदर्भीय अर्जावर झालेल्या विलंबाची कार्यालयीन नोंदी/आवक-जावक नोंद/फाईल हालचाल तपासून चौकशी करण्यात यावी.
2. प्रकरण सात कामकाजाच्या दिवसांपेक्षा अधिक काळ कोणत्या अधिकारी/कर्मचाऱ्याकडे प्रलंबित होते, याची जबाबदारी निश्चित करण्यात यावी.
3. दप्तर दिरंगाई/कर्तव्यपालनात कसूर आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन व शासकीय कर्तव्ये पार पाडण्यास होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, 2005 तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 मधील लागू तरतुदींनुसार नियमानुसार शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी.
4. माझ्या मूळ अर्जावर तातडीने गुणवत्तापूर्ण निर्णय घेऊन त्याची लेखी माहिती मला देण्यात यावी.
5. केलेल्या चौकशीची व कार्यवाहीची माहिती कारणांसह लेखी स्वरूपात देण्यात यावी.
नागरिकांच्या अर्जांवर विहित कालमर्यादेत कार्यवाही होणे हे पारदर्शक, उत्तरदायी व नागरिकाभिमुख प्रशासनासाठी आवश्यक आहे. त्यामुळे सदर तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी.
सबब, सविनय सादर.
दिनांक : ____________
ठिकाण : ____________
निवेदन/तक्रारदार
नाव :
स्वाक्षरी : ______________________
सोबत :
1. संदर्भीय क्र. 1 मधील अर्ज/निवेदन/तक्रारीची प्रत.
2. अर्ज सादर केल्याचा पुरावा/पोहोच/आवक क्रमांक (उपलब्ध असल्यास).
3. इतर संबंधित कागदपत्रे.Pachpute