02/10/2026
स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत शेतकरी व शेतमजुरांचा आसुड मोर्चा
सोमवार, दि.५ ऑक्टोबर २०२६, सकाळी ११ वा.
ठिकाणः टॉवर चौक ते तहसील कार्यालय, तेल्हारा, जि. अकोला
प्रमुख मागण्या
* शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये दुष्काळी मदत द्या.
* दुष्काळी पार्श्वभूमीवर शेतात काम करणाऱ्या भूमिहीन शेतमजुरांच्या कुटुंबाला किमान रुपये ५० हजार अर्थसहाय्य करा.
* शेतकऱ्यांना विना अट सरसकट कर्जमुक्त करून नव्याने तत्काळ पिककर्ज द्या.
* मागील वर्षीचा खरीप पिकाचा रोखलेला पिक विमा व चालू वर्षाचा 100% विमा रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरीत करा.
* सोयाबीनचे बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्याचे कायमस्वरूपी परवाने रद्द करून, शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्या.
* राज्यातील केळी पिकाचा रोखलेला विमा आणि चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित करा.
* सुमतीबाई सुकळीकर योजनेची अंमलबजावणी करा व राज्यातील महिला बचत गटाचे संपूर्ण व्याजाची रक्कम परत द्या.
* तेल्हारा तालुक्यातील क्षारयुक्त पाणी बंद करुन, नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा करा.
* राज्यातील आत्महत्या रोखण्यासाठी तत्काळ दुष्काळाच्या सुविधा सुरू करा.
हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा.
आयोजक - प्रशांत डिक्कर
प्रदेशाध्यक्ष, स्वराज्य शेतकरी आघाडी