Manisha Dnyaneshwar Katke

Manisha Dnyaneshwar Katke मनीषा ज्ञानेश्वर कटके

जनसेवा हाच धर्म | समाजातील प्रत्येक घटकासाठी निस्वार्थीपणे कार्यरत |
महिला सक्षमीकरण, शिक्षण व सामाजिक उपक्रम

17/09/2026

वाघेश्वर नगर येथे सुरू असलेल्या ड्रेनेज कामकाजाची पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व तक्रारी जाणून घेतल्या. तसेच नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने उपाययोजना करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आमदार मा. ज्ञानेश्वर (माऊली) आबा कटके यांच्या वतीने दिल्या.

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!मारवेल फ्रिया सोसायटी, लोहगाव रोड येथे श्री गणरायाच्या आरतीसाठी उपस्थित राहिले. याव...
16/09/2026

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!

मारवेल फ्रिया सोसायटी, लोहगाव रोड येथे श्री गणरायाच्या आरतीसाठी उपस्थित राहिले. यावेळी मनोभावे आरती करून गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी नगरसेवक श्री. अनिल सातव पाटील देखील उपस्थित होते.

दरम्यान गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि मंगलमय भविष्यासाठी प्रार्थना केली. यावेळी सोसायटीतील नागरिकांशी आपुलकीने संवाद साधत गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! चॅलेंज युथ संघ, वाघोली येथे श्री गणरायाची मनोभावे आरती करण्याचा मान लाभला. यावेळी ...
16/09/2026

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!

चॅलेंज युथ संघ, वाघोली येथे श्री गणरायाची मनोभावे आरती करण्याचा मान लाभला. यावेळी सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो, अशी प्रार्थना केली. तसेच उपस्थित सर्वांना गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!राजे प्रतिष्ठान, वाघोली येथे श्री गणरायाची मनोभावे आरती करण्याचा पावन योग आला. यावे...
16/09/2026

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!

राजे प्रतिष्ठान, वाघोली येथे श्री गणरायाची मनोभावे आरती करण्याचा पावन योग आला. यावेळी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो, अशी सदिच्छा व्यक्त केली.

तळेगाव ढमढेरे (माळीमळा), ता. शिरूर येथील श्री. सुनिल भुजबळ यांचे ज्येष्ठ चिरंजीव ऋषिकेश आणि मरकळ, ता. खेड येथील श्री. सं...
15/09/2026

तळेगाव ढमढेरे (माळीमळा), ता. शिरूर येथील श्री. सुनिल भुजबळ यांचे ज्येष्ठ चिरंजीव ऋषिकेश आणि मरकळ, ता. खेड येथील श्री. संतोष लोखंडे यांची द्वितीय कन्या ज्योती यांच्या विवाह सोहळ्यास गीताई विष्णू गार्डन मंगल कार्यालय, तळेगाव ढमढेरे येथे उपस्थित राहिले.

यावेळी समस्त भुजबळ आणि लोखंडे परिवाराशी संवाद साधून शुभेच्छा दिल्या. तसेच वधूवरांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

निमगाव भोगी, ता. शिरूर येथील श्री. अजय आसवले यांचे चिरंजीव सुरज आणि श्रीगोंदा तालुक्यातील श्री. मोहन मदने यांची कन्या सं...
15/09/2026

निमगाव भोगी, ता. शिरूर येथील श्री. अजय आसवले यांचे चिरंजीव सुरज आणि श्रीगोंदा तालुक्यातील श्री. मोहन मदने यांची कन्या संपदा यांच्या विवाह सोहळ्यास वृंदावन लॉन्स, कारेगाव (ता. शिरूर) येथे उपस्थित राहिले.

यावेळी वधूवरांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

अरणगाव दुमाला, ता. श्रीगोंदा येथील कै. सुजित सातव यांचे ज्येष्ठ चिरंजीव ओम आणि निमगाव म्हाळुंगी, ता. शिरूर येथील श्री. स...
15/09/2026

अरणगाव दुमाला, ता. श्रीगोंदा येथील कै. सुजित सातव यांचे ज्येष्ठ चिरंजीव ओम आणि निमगाव म्हाळुंगी, ता. शिरूर येथील श्री. संभाजी चौधरी यांची ज्येष्ठ कन्या नेहा यांच्या साखरपुडा समारंभास कानिफनाथ मंगल कार्यालय, न्हावरा फाटा, सरदवाडी येथे उपस्थित राहिले.

यावेळी भावी दाम्पत्याचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

श्री. कैलास चव्हाण यांची ज्येष्ठ कन्या वैष्णवी आणि रामदास गायकवाड यांचे चिरंजीव शुभम यांच्या साखरपुडा समारंभास शिरूर नगर...
15/09/2026

श्री. कैलास चव्हाण यांची ज्येष्ठ कन्या वैष्णवी आणि रामदास गायकवाड यांचे चिरंजीव शुभम यांच्या साखरपुडा समारंभास शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालय (ता. शिरूर) येथे उपस्थित राहिले.

यावेळी भावी दाम्पत्याचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

चिंचणी, ता. शिरूर येथे कै. दादा (बाबा) बाळासो पवार यांच्या दशक्रिया विधीसाठी उपस्थित राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण के...
15/09/2026

चिंचणी, ता. शिरूर येथे कै. दादा (बाबा) बाळासो पवार यांच्या दशक्रिया विधीसाठी उपस्थित राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी समस्त पवार कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली.

चिंचणी, ता. शिरूर येथे कै. नारायण पांडुरंग पवार यांच्या दशक्रिया विधीसाठी उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्...
15/09/2026

चिंचणी, ता. शिरूर येथे कै. नारायण पांडुरंग पवार यांच्या दशक्रिया विधीसाठी उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

दरम्यान पवार कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांच्या दुःखात सहभागी झाले आणि दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभो, अशी प्रार्थना केली.

Address

Wagholi
Pune
412208

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Manisha Dnyaneshwar Katke posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category